एक्स्प्लोर
दक्षिण युरोपमध्ये उष्णतेची लाट, 'ल्युसिफर'मुळे पारा 42 अंशांपार
इटली, स्वित्झर्लंड, हंगेरी, पोलंड, बोस्निया, क्रोएशिया आणि सर्बिया या देशांना 'रेड अलर्ट एरिया' घोषित करण्यात आलं आहे. स्पेन, बल्गेरिया, फ्रान्स, मेसिडोनिया आणि मोल्दोवामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
लंडन : दक्षिण युरोपातील नागरिकांना सध्या भीषण तापमानाचा सामना करावा लागत आहे. दक्षिण युरोपचं तापमान 42 अंश सेल्सिअसला पोहोचलं आहे. त्यामुळे युरोपमधील काही देशातल्या नागरिकांचा मृत्यूही झाला आहे.
युरोपमधील उष्णतेच्या लाटेला 'ल्युसिफर' असं नाव देण्यात आलं आहे. या तापमानवाढीमुळे पोर्तुगालच्या जंगलात आग लागून 60 जणांचा मृत्यू झाला आहे. अब्जावधी रुपयांच्या पिकांचं नुकसान झालं आहे.
इटली, स्वित्झर्लंड, हंगेरी, पोलंड, बोस्निया, क्रोएशिया आणि सर्बिया या देशांना 'रेड अलर्ट एरिया' घोषित करण्यात आलं आहे. स्पेन, बल्गेरिया, फ्रान्स, मेसिडोनिया आणि मोल्दोवामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. इटलीमध्ये तीन, तर रोमानियात दोघांचा बळी गेला आहे. तर अनेकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची वेळ आली आहे.
ग्लोबल वॉर्मिंगच्या दुष्परिणामांकडे डोळेझाक केल्यास या शतकाच्या अखेरपर्यंत युरोपात दरवर्षी दीड लाख लोकांचा मृत्यू ओढावेल, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. 1981 ते 2010 या कालावधीत दरवर्षी तीन हजार नागरिकांचा तापमानवाढीने बळी गेला. हाच आकडा 2017 ते 2100 या वर्षांमध्ये वार्षिक 1 लाख 52 हजार जणांच्या मृत्यूत परावर्ति होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement