एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
दीपिकाच्या स्वयंपाकघरापासून ते असंख्य मीम्समध्ये पोहोचलेल्या 'या' व्यक्तीकडून आता मदतनिधी गोळा करण्यास हातभार
मागील काही दिवसांपासून अनेक मीम्समधून या व्यक्तीचा चेहरा पाहायला मिळाला आहे. याबाबतचं कुतूहल इतकं की कलाकार मंडळींनाही सोशल मीडियावर यासंदर्भातील मीम्स शेअर करण्याचा मोह आवरता आलेला नाही.
![दीपिकाच्या स्वयंपाकघरापासून ते असंख्य मीम्समध्ये पोहोचलेल्या 'या' व्यक्तीकडून आता मदतनिधी गोळा करण्यास हातभार From Bollywood celebs Meme To Merch Bernie Sanders Turns Viral Photo Into A Way To Raise Money For Charity दीपिकाच्या स्वयंपाकघरापासून ते असंख्य मीम्समध्ये पोहोचलेल्या 'या' व्यक्तीकडून आता मदतनिधी गोळा करण्यास हातभार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/25160737/viralphoto.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून एका खुर्चीवर बसलेल्या वृद्ध व्यक्तीचा फोटो सोशल मीडियायवर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटोच नव्हे, तर त्यावर आधारित धमाल मीम्सही नेटकऱ्यांच्या विश्वात कमालीची लोकप्रियता मिळवत आहेत.
अभिनेत्री दीपिका पदुकोण, मलायका अरोरा यांच्या फोटोंमध्येही ते दिसले. दीपिकाच्या स्वयंपाकघताच ते पोहोचले असं एक मीमही व्हायरल झालं. खुद्द दीपिकानंही ते शेअर केलं. देसी गर्ल प्रियांका चोप्रा, डेडपुल फेम अभिनेता Ryan Reynoldsनंही एक फोटो पोस्ट केला. जिथं तो चित्रीकरणादरम्यान स्क्रीप्ट वाचताना दिसत आहे, तर हे व्यक्ती त्यांच्याच बाजूला बसलेले दिसत आहेत.
आता ते आहेत तरी कोण, असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यातील हा फोटो. शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी हा फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली. या फोटोत दिसणारी ही वृद्ध व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे सेनेटर बर्नी सँडर्स.
मदतनिधी गोळा करण्यासाठी सँडर्सही करताहेत त्यांच्याच व्हायरल फोटोचा वापर
एकिकडे सोशल मीडियावर आपला फोटो व्हायरल होत असतानाच पाहून युएस सेनेटर बर्नी सँडर्स यांनी ही बाब अतिशय सकारात्मकतेनं घेत त्यांच्या व्हायरल फोटोचा वापर मदतनिधी गोळा करण्यासाठी केला आहे. कपड्यांवर हा फोटो छापत त्या कपड्यांची विक्री करत या माध्यमातून मदतनिधी गोळा करण्यात येत आहे. ‘Meal on Wheels’ या अनोख्या उपक्रमासाठी हा मदतनिधी गोळा केला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत स्वत:साठी अन्न शिजवू न शकणाऱ्या अनेक गरजूंपर्यंत खाद्यपदार्थांचा पुरवठा केला जातो.
View this post on Instagram
View this post on Instagram
Lol Bernie Sanders threw his meme on a sweatshirt. Charged $45 for it. Sold out immediately in all sizes. Then donated 100% of the proceeds to MealsonWheels Vermont 👏🏽👏🏽👏🏽 https://t.co/uRHAU0CwKm pic.twitter.com/WzhNNmrkQv
— ًً (@someknew) January 23, 2021
![दीपिकाच्या स्वयंपाकघरापासून ते असंख्य मीम्समध्ये पोहोचलेल्या 'या' व्यक्तीकडून आता मदतनिधी गोळा करण्यास हातभार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/25161441/viralphotob.jpg)
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)