एक्स्प्लोर

Free Internet : या देशातील लोक वापरतात फ्री इंटरनेट, मतदानासह सर्व सुविधा ऑनलाईन; सायबर गुन्ह्यांचा धोका नाही

Free Internet Service in Estonia: स्मार्टफोन आणि इंटरनेट सुविधा सर्वत्र उपलब्ध आहेत. इंटरनेट सुविधेसाठी आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला पैसे मोजावे लागतात. पण एका देशात इंटरनेट पूर्णपणे मोफत आहे.

मुंबई : सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट पोहोचलं आहे. इंटरनेटमुळे संपूर्ण जग जवळ आलं आहे. जगभरातील बहुतांश लोकांकडे सध्या स्मार्ट फोन आणि इंटरनेट सुविधा आहेत. इंटरनेट सुविधा मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पैसे मोजावे लागतात. पण तुम्हाला माहित आहे का, जगात असाही एक देश आहे जिथे संपूर्ण देशासाठी इंटरनेट सुविधा मोफत आहे. एवढेच नाही तर इथे मतदानही ऑनलाईन होतं आणि या देशात सायबर गुन्हेही शून्य आहेत. या देशाबद्दल सविस्तर माहिती वाचा.

या देशात मोफत इंटरनेट सुविधा

युरोपमधील एका देशात इंटरनेट सुविधा मोफत आहे. एस्टोनिया हा युरोपमधील एक छोटासा देश आहे. या देशात लोकांना इंटरनेट वापरण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही. येथे इंटरनेट सुविधा पूर्णपणे फ्री आहे. या देशात प्रत्येक सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहे. एस्टोनिया हा संपूर्ण जगात मोफत इंटरनेट वापरासाठी एक मॉडेल देश आहे, असं फ्रीडम हाऊस या अमेरिकन गैर-सरकारी संस्थेने अहवालात म्हटले आहे. टॅक्स रिटर्न भरण्यापासून ते कार पार्किंगसाठी पैसे भरण्यापर्यंत एस्टोनियन नागरिकही ऑनलाइन पैसे भरतात. 

24 वर्षांपासून इंटरनेट सुविधा मोफत

इंटरनॅशनल ब्रॉडबँड स्पीड इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनुसार, नॉर्वेमध्ये सर्वाधिक नेट स्पीड आहे. आकडेवारीनुसार, मोबाइल फोनचा सरासरी इंटरनेट स्पीड गेल्या वर्षी 69 टक्क्यांनी वाढला होता. सध्या ते 52.6 मेगाबाइट्स प्रति सेकंद आहे. सोप्या भारतीय भाषेत 400 MB चा चित्रपट डाउनलोड करण्यासाठी फक्त 8 सेकंद लागतील. मिळालेल्या माहितीनुसार, 2000 पासून एस्टोनिया देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. येथील जवळपास 90 टक्के लोक इंटरनेट कनेक्टिव्हिटी वापरत आहेत. एवढेच नाही तर येथे निवडणुकीतील मतदानही ऑनलाइन होते.

सायबर गुन्ह्यांच्या धोका शून्य 

इंटरनेटची मोफत उपलब्ध असताना सायबर गुन्हे सर्वाधिक असण्याची शक्यता तुम्हाला वाटत असेल, पण एस्टोनिया देशाची खास गोष्ट म्हणजे देशात सर्वत्र मोफत वाय-फाय असूनही येथे सायबर गुन्हे नगण्य आहेत. एस्टोनियन सरकार (Estonia Government) इंटरनेटच्या योग्य वापराबाबत वेळोवेळी मोहिमा राबवत असते. इंटरनेट मोफत असले तरी अनेक गोष्टींवर बंधने आहेत. जुगार कायद्यांतर्गत, कोणत्याही देशी आणि विदेशी जुगार साइटसाठी विशेष परवाना आवश्यक आहे. याशिवाय, जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एस्टोनिया हा निवडक देशांपैकी एक आहे जिथे हवेची गुणवत्ता (AIQ) सर्वोत्तम आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं
NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट लातूरपर्यंत; बिहार कनेक्शनपाठोपाठ आता महाराष्ट्र कनेक्शन समोर, दोन शिक्षक ताब्यात
नीट पेपरफुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत; दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात
मी फार वांड, प्रचंड बंडखोर होतो; चौथीत बीड्या प्यायचो; गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात विजय शिवतारे यांनी सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा
मी फार वांड, प्रचंड बंडखोर होतो; चौथीत बीड्या प्यायचो; विजय शिवतारे यांनी सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा
Horoscope Today 23 June 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 23 June 2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव : 23 June 2024Manoj Jarange on Chhagan Bhujbal : जातीय वाद झाले तर भुजबळ जबाबदार - मनोज जरांगेABP Majha Headlines :  7:00AM : 23 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं
NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट लातूरपर्यंत; बिहार कनेक्शनपाठोपाठ आता महाराष्ट्र कनेक्शन समोर, दोन शिक्षक ताब्यात
नीट पेपरफुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत; दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात
मी फार वांड, प्रचंड बंडखोर होतो; चौथीत बीड्या प्यायचो; गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात विजय शिवतारे यांनी सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा
मी फार वांड, प्रचंड बंडखोर होतो; चौथीत बीड्या प्यायचो; विजय शिवतारे यांनी सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा
Horoscope Today 23 June 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
T20 World Cup 2024 :  सेमी फायनलमधील दोन संघ आजच निश्चित होणार,सुपर 8 मध्ये कोणते संघ आघाडीवर 
टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये कोणते संघ जाणार? दोन टीम आज निश्चित होणार
Horoscope Today 23 June 2024 : कुंभ राशीचा आजचा दिवस खर्चिक; मकर, मीन राशीने घ्यावी फक्त एका गोष्टीची काळजी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कुंभ राशीचा आजचा दिवस खर्चिक; मकर, मीन राशीने घ्यावी फक्त एका गोष्टीची काळजी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Murlidhar Mohol VIDEO : मुंडे साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं, आज ते असायला हवे होते; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत मुरलीधर मोहोळ भावुक
मुंडे साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं, आज ते असायला हवे होते; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत मुरलीधर मोहोळ भावुक
भारताच्या विजयाचे 5 शिल्पकार; कुलदीपची फिरकी, बुमराहचा भेदक मारा अन् हार्दिकचा अष्टपैलू टच!
भारताच्या विजयाचे 5 शिल्पकार; कुलदीपची फिरकी, बुमराहचा भेदक मारा अन् हार्दिकचा अष्टपैलू टच!
Embed widget