एक्स्प्लोर
VIDEO : पाकचा माजी कर्णधार मियांदादची मोदींविरोधात गरळ
इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा नातेवाईक जावेद मियांदादने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात गरळ ओकली आहे. 'यह लाथोंके भूत है, बातों से नही मानते, इन्हे लाथ मारनी ही पडेगी' अशी दर्पोक्ती मियादांदने केली आहे.
समा टीव्ही या पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारतावरी टीकास्त्र सोडलं आहे. भारताला कमकुवत ठरवून युद्ध छेडण्याचं आवाहनही केलं आहे. मियांदादचा हा व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल झाला आहे. मियांदादने मोदी आणि भारतीय लष्कराविषयी अपशब्द काढले आहेत.
'जिवंत राहाल, तर बोलणी होईल ना, या घाबरटांना जशास तसं उत्तर देण्याची गरज आहे. हे तर असेच घाबरतात' अशी आगपाखड मियांदादने भारतावर केली आहे. मियांदाद हा पाकिस्तानच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो.
भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. भारत-पाकमध्ये शांततेची आशा बाळगणाऱ्या शाहिद आफ्रिदीनेही वक्तव्यावरुन घूमजाव केलं आहे.
पाहा व्हिडिओ :
https://twitter.com/SAMAATV/status/781464742795837440
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement