फेसबुककडून म्यानमार लष्कराचे मुख्य पेज डिलीट, नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी कारवाई
फेसबुकने म्यानमारचे लष्कराचे मुख्य पेज डिलीट केलं आहे. नियमांचे उल्लघन केल्यामुळे ही कारवाई केल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
Facebook : फेसबुकने म्यानमार सैन्याचे मुख्य पेज डिलीट केलं आहे. हिंसाचारास उद्युक्त करण्याच्या मानदंडांनुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. एक फेब्रुवारीला पोलिसांच्या गोळीबारात दोन आंदोलक ठार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर फेसबुकने हे पाऊल उचलले आहे.
“आमच्या जागतिक धोरणांच्या अनुषंगाने आम्ही आमच्या समुदाय मानदंडांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे हिंसाचारास उत्तेजन देणे आणि लोकांना हानी पोहचवणे यातून टाटमॅडॉ ट्रू न्यूज इन्फर्मेशन टीम (Tatmadaw True News Information Team) पेज फेसबुकवरून काढून टाकले आहे,’ असे एका फेसबुक प्रतिनिधीने निवेदनात म्हटले आहे.
म्यानमारच्या लष्कराला टाटमॅडॉ म्हणून ओळखले जाते. रविवारी (21 फेब्रुवारी) त्याचे ट्रू न्यूज पेज फेसबुकवर दिसणे बंद झाले आहे. दरम्यान, म्यानमार लष्कराच्या प्रवक्त्याने याबद्दल अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.
शनिवारी म्यानमारच्या दुसरे शहर मंडाल्यात दोन लोक ठार झाले. पोलिस आणि सैनिकांनी औंग सॅन सू यांच्या सरकारविरोधात निदर्शने करणाऱ्या निदर्शकांवर गोळीबार केला. यात दोन आंदोलक ठार झाले आहेत. दोन आठवड्यांहून अधिक काळापासून हा संघर्ष सुरु असल्याची माहिती एका आंदोलकाने दिली.