चीनच्या प्रयोगशाळेतूनच कोरोना व्हायरसचा प्रसार, आमच्याकडे पुरावे; अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्याचाही दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरात कोरोना व्हायरस पसरण्यासाठी चीन जबाबदार असल्याचा दावा वारंवार करत आहेत. अशातच अमेरिकेचे विदेश मंत्री माइक पॉम्पियो यांनीही चीनच्या प्रयोगशाळेत कोरोनाचा जन्म झाल्याचा दावा केला आहे.
नवी दिल्ली : चीनच्या वुहान शहरातून कोरोना व्हायरस जगभरात पसरला. सध्या कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात दिसून येत आहे. जगभरातील जवळपास सर्वच देश या जीवघेण्या व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. परंतु, सध्या इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत या व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वाधिक दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सतत दावा करत आहेत की, कोरोना हा एक मानवनिर्मित व्हायरस आहे आणि याची उत्पत्ती चीनमधील एका प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता विदेश मंत्री माइक पॉम्पियो यांनीही हाच दावा केला आहे.
अमेरिकेचे विदेश मंत्री माइक पॉम्पियो यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस चीनच्या कपटीपणाचं फळ आहे. पॉम्पियो पुढे म्हणाले की, आमच्याकडे हा व्हायरस वुहानमधूनच आला असल्याचे सबळ पुरावेदेखील आहेत. अमेरिकेतील ABC या वृत्तवाहिनीतील एका कार्यक्रमात माइक पॉम्पियो यांनीदेखील आरोप लावला आहे की, 'चीनकडे कोरोना थांबवण्याची संधी होती, परंतु त्यांनी मुद्दाम असं केलं नाही.'
माइक पॉम्पियो यांनी सांगितलं की, 'लक्षात ठेवा जगभरात व्हायरस परवण्यासाठी आणि निन्म स्तरांतील प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी चीनचा फार जुना रेकॉर्ड आहे. चीनमुळे जगभरात व्हायरस पसरण्याची ही पहिली वेळ नाही. गुप्तचर विभाग यासंदर्भात माहिती गोळा करत आहे. याआधीही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात पुरावे असल्याचं सांगितलं आहे.'
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे विदेश मंत्री माइक पॉम्पियो जरी कोरोना जगभरात पसरवण्यासाठी चीन जबाबदार असल्याचं सांगत असले, तरिही अमेरिकेतील गुप्तचर विभागाने कोरोना मानव निर्मित असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, अमेरिकेमध्ये कोरोनाचे 11 लाख 85 हजार 285 रूग्ण आहेत. तर 68,507 लोकांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :
लक्षणं न आढळणारे कोरोना रुग्णही ओळखणार, स्वित्झर्लंडच्या अँटीबॉडी चाचणीला अमेरिकेची मंजुरी
Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 35 लाख पार; तर 2 लाख 48 हजार मृत्यू
Coronavirus | 45 मिनिटांत कोरोनाच्या टेस्टचा रिझल्ट समजणार; संशोधकांचा महत्त्वपूर्ण शोध