Coronavirus | 45 मिनिटांत कोरोनाच्या टेस्टचा रिझल्ट समजणार; संशोधकांचा महत्त्वपूर्ण शोध
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशोधकांचं संशोधन अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. संशोधकांनी कोरोना व्हायरसची तपासणी झटपट करण्यासाठी एक नवं स्वॅब टेस्ट किट शोधलं आहे. या किटमार्फत अवघ्या 45 मिनिटांमध्ये कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग आहे की, नाही. हे समजणं शक्य होणार आहे.
वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसपुढे अख्खं जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 लाखांवर गेला आहे. संपूर्ण जग कोरोनावर उपचार करण्यासाठी अने नवनव्या पद्धती शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच कोरोना संशयितांची टेस्ट केल्यानंतर त्याचा अहवाल येण्यासाठी बराच वेळ लागतो. अशातच काही संशोधकांनी कोरोना व्हायरसची तपासणी झटपट करण्यासाठी एक नवं स्वॅब टेस्ट किट शोधलं आहे. या किटमार्फत अवघ्या 45 मिनिटांमध्ये कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग आहे की, नाही. हे समजणं शक्य होणार आहे. यामुळे कोरोना संशयितांची चाचणी झटपट करण्यास मदत होणार आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिवर्सिटीच्या संशोधकांनी सांगितल्यानुसार, नवीन टेस्ट 'सार्स-कोवी-2 डिटेक्टर' (SARS-CoV-2) हे नाव देण्यात आलं आहे. हे टेस्ट अगदी सहज वापरणं शक्य आहे. यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची गरज भासणार नाही. कोरोना व्हायरसची ही चाचणी सध्या उपलब्ध असलेल्या चाचणीप्रमाणेच काम करते. या नव्या टेस्टला अद्याप अमेरिकी फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनकडून परवानगी मिळाली नाही.
पाहा व्हिडीओ : जगभरात कोरोनाचा कहर सुरूच! जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 32 लाखांच्या पुढे
कॅलिफोर्निया युनिवर्सिटीचे प्रोफेसर चार्ल्स चिउ यांनी सांगितल्यानुसार, 'क्रिस्पर टेक्नॉलॉजीने शोधलेल्या या नव्या टेस्टमुळे कोरोना संसर्गाच्या तपासण्या झटपट करण्यास मदत मिळणार आहे.' 'सार्स-कोवी-2 डिटेक्टर' असं पहिलं किट आहे, ज्यामध्ये कोविड-19 ची तपासणी करण्यासाठी क्रिस्पर जीन - टार्गेटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.
टेस्टच्या प्रक्रियेत कोणताही जेनेटिक सिक्वेंस साधणं शक्य होतं. याप्रकारच्या जेनेटिक सिक्वेंसमध्ये सर्व सार्ससारख्या कोरोना व्हायरसमध्ये समान असतो. या डिटेक्टर टेस्टमध्ये याच सिक्वेंसवर लक्ष दिलं जात आहे.
संबंधित बातम्या :
Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 32 लाखांवर तर 10 लाख रुग्ण बरे
व्हाईट हाऊसकडून अवघ्या 19 दिवसात पंतप्रधान मोदी ट्विटरवर अनफॉलो!
Coronavirus | कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ, संसर्ग वाढणं चिंतेची बाब : WHO