एक्स्प्लोर
Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 35 लाख पार; तर 2 लाख 48 हजार मृत्यू
जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. पण अमेरिका, स्पेन आणि इटलीमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होताना दिसत आहे.
मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. जगात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 35 लाख 65 हजार 310 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 48 हजार 565वर पोहोचली आहे. तसेच या व्हायरसपासून जगभरात 11 लाख 54 हजार रुग्ण बरे झाले आहेत.
अमेरिकेत कोरोनाचा कहर
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगाची तुलना केल्यास एकट्या अमेरिकेत कोरोना व्हायरसचे 35 टक्के रुग्ण आहेत. ताज्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 11 लाख 88 हजार 112 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 68 हजार 598 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. अमेरिकेत 78 हजार 263 लोक बरे झाले आहेत.
स्पेन आणि इटलीमध्ये कोरोनाचा आकडा वाढताचं
अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोरोनाचा जास्त परिणाम पाहायला मिळातो आहे. स्पेनमध्ये 2 लाख 47 हजार 122 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 25 हजार 264 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेननंतर कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 28 हजार 844 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 10 हजार 717 इतका आहे.
जगातील अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन हे पाच देश असे आहेत जिथं कोरोनामुळे 20 हजाराहून अधिक बळी गेले आहेत. एकट्या अमेरिकेत कोरोनाचे 60 हजारांहून अधिक बळी गेले आहेत.
इतर देशांतील कोरोनाची स्थिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement