(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Elon Musk Update : इलॉन मस्क '2021 पर्सन ऑफ द इयर', टाईम मॅगझिनकडून मोठा सन्मान
Elon Musk Update : जगातील अव्वल उद्योजक आणि व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या इलॉन मस्क यांना टाईम मॅगझिनने Person Of The Year 2021 ने सन्मानित केलं आहे.
Elon Musk Update : जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये मोजल्या जाणारा इलॉन मस्क (Elon Musk) कायम चर्चेत असतो. त्याच्या व्यवसातील प्रगतीसह अगदी हटके ट्वीट्ससाठी मस्क कायम चर्चेत असतो. पण आता तो चर्चेत आला आहे, कारण जगातील आघाडीचं मॅगझिन असणाऱ्या टाईम मॅगझिनने (TIME Magzine) 2021 पर्सन ऑफ द इयरने (Person Of The Year 2021) मस्कला सन्मानित केलं आहे. मस्कआधी मागील वर्षी हा सन्मान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्षा कमला हॅरीस यांना मिळाला होता.
जगप्रसिद्ध अमेरिकन उद्योजक इलॉन मस्क यांना हा खिताब मिळण्यामागे त्याची व्यावसायिक तसंच तांत्रिक क्षेत्रातील अप्रतिम कामगिरीमुळे देण्यात आला आहे. दरम्यान नासा ही एक आगामी अंतराळ मोहिम लवकरच राबवणार असून या मोहिमेद्वारे पृथ्वीवर बऱ्याच वर्षांपासून पडणाऱ्या लघुग्रहांना रोखण्यासाठी नासा प्रयत्न करणार आहे. याला डबल अॅस्टरॉईड रेडिकेशन टेस्ट (Double Asteroid Redirection Test) असं नाव देण्यात आलं आहे. या मोहिमेसाठी एलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्स (SpaceX) मदत करणार असल्याने मस्कही या मोहिमेत एक जबाबदारी पेलणार आहे.
कोण आहे एलॉन मस्क?
एलॉन मस्क याचं नाव जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये घेतलं जात. त्याची संपत्ती ही जवळपास 266 डॉलर्स बिलीयन इतकी आहे. मस्क जगातील अव्वल उद्योजक आणि व्यावसायिक असून टेस्ला आणि स्पेस एक्सचे या दोन्ही कंपनीचा सीईओ देखील आहे. यातील टेस्ला कंपनी गाड्यांची निर्मिती करते. तर स्पेस एक्स कंपनी ही एक एरोस्पेस कंपनी असून आधुनिक विमानं आणि रॉकेट्सचे पार्ट बनवण्याचं काम करते.
हे ही वाचा :
- विमान चोरण्यासाठी 'बॉम्ब'सह विमानतळावर एकाची घुसखोरी, म्हणाला...
- Miss Universe 2021 : विश्वसुंदरी हरनाज संधू आधी 'या' भारतीय सुंदरीनी पटकावलाय किताब
- Vodafone Idea New Tariff : एअरटेलनंतर व्हीआयचाही रिचार्ज महागला, जाणून घ्या व्हीआयचे नवे प्लॅन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha