(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Miss Universe 2021 : विश्वसुंदरी हरनाज संधू आधी 'या' भारतीय सुंदरीनी पटकावलाय किताब
Miss universe 2021 : भारताची हरनाज संधूनं विश्वसुंदरीचा (Miss Universe 2021) किताब मिळवला आहे. ती अवघ्या 21 वर्षांची आहे. हरनाझ विश्वसुंदरी होणारी तिसरी भारतीय आहे.
Miss universe 2021 : भारताची हरनाज संधूनं (Harnaaz Sandhu) विश्वसुंदरीचा (Miss Universe 2021) किताब मिळवला आहे. ती अवघ्या 21 वर्षांची आहे. हरनाज विश्वसुंदरी होणारी तिसरी भारतीय आहे. तब्बल 21 वर्षानंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 2000 साली लारा दत्तानं विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला. त्यानंतर आता 2021 मध्ये हरनाज संधूनं विश्वसुंदरीचा किताब मिळवला आहे. आज स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. भारताचा मान उंचावत हरनाज 'Miss Universer 2021' किताबाची मानकरी ठरली आहे. किताब जिंकल्यानंतर हरनाज म्हणाली की, ''मी देवाची ऋणी आहे. सोबतच माझ्या पालकांचंही मी आभार प्रकट करते. भारतासाठी 21 वर्षांनंतर मिस युनिवर्सचा किताब परत ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.''
The new Miss Universe is...India!!!! #MISSUNIVERSE pic.twitter.com/DTiOKzTHl4
— Miss Universe (@MissUniverse) December 13, 2021
तब्बल 21 वर्षांनंतर विश्वसुंदरीच्या मुकुटावर भारताचं नाव कोरलं गेलं आहे. या आधी सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि लारा दत्ता (Lara Dutta) यांनी विश्वसुंदरीचा किताब आपल्या नावे केला आहे.
सुष्मिता सेन - 1994
अभिनेत्री सुष्मिता सेन हिने 1994 साली पहिल्यांदा विश्वसुंदरीचा किताब पटकावला. ती विश्वसुंदरी स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय आहे. तिला 1994 साली फेमिना मिस इंडिया होण्याचा मान मिळाला. त्यावेळी सुष्मिता केवळ 18 वर्षांची होती. 1996 मध्ये सुष्मिताने 'दस्तक' या हिंदी चित्रपटाद्वारे तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. हिंदी भाषेतील चित्रपटांसोबत तिने काही तामिळ आण इंग्रजी भाषांतील चित्रपटांमधूनही भूमिका केल्या.
लारा दत्ता - 2000
अभिनेत्री लारा दत्ताने 2000 साली विश्वसुंदरी होण्याचा किताब मिळवला. 1997 मध्ये लारा मिस इंटरकॉन्टिनेंटलचा स्पर्धेची विजेती ठरली. लारा दत्ताने फेमिना मिस इंडिया 2000 स्पर्धा जिंकली होत्या. तिने 2003 साली 'अंदाज' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पर्दापणासाठी फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला.
इतर बातम्या :
- Miss universe 2021 : भारताची हरनाझ संधू बनली विश्वसुंदरी, पटकावला 'मिस युनिवर्स'चा किताब
- Miss Universe 2021 : 21 वर्षांची प्रतीक्षा, चंदीगडच्या हरनाझ संधूनं भारतीयांचं स्वप्न केलं पूर्ण
- Miss Universe Harnaaz Sandhu : 21 वर्षांनंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, किताब जिंकल्यानंतर मिस युनिवर्स हरनाझ संधू म्हणाली...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha