Egypt Bus Accident : इजिप्तमध्ये बसचा भीषण अपघात, कालव्यात बस कोसळून 22 प्रवाशांचा मृत्यू
Bus Accident : इजिप्तच्या उत्तर डकहलिया प्रांतातील मिस्रमध्ये बसचा भीषण अपघात (Egypt Bus Accident) झाल्याची घटना घडली.
Egypt Bus Accident : इजिप्तच्या उत्तर डकहलिया प्रांतातील मिस्रमध्ये बसचा भीषण अपघात (Egypt Bus Accident) झाल्याची घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात पडल्याची घटना घडली. यामध्ये 22 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण यामध्ये जखमी झाले आहे. इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ही बस महामार्गावरून घसरुन मन्सौरा कालव्यात पडली. दरम्यान, 18 रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
22 killed as minibus falls into canal in Egypt
— ANI Digital (@ani_digital) November 12, 2022
Read @ANI Story | https://t.co/YpHLGNq9Do#Egypt #RoadAccident #Minibus pic.twitter.com/UK2pC7sCfp
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये सहा महिला आणि तीन मुलांचाही समावेश आहे. इजिप्तमध्ये रस्ते अपघात नित्याचे झाले आहेत. येथे दरवर्षी हजारो लोकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागतो. गेल्या महिन्यात इजिप्तच्या नाईल डेल्टामध्ये मिनीबस आणि लॉरी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला होता, तर नऊ जण जखमी झाले होते.
बसमध्ये प्रशांबरोबर काही विद्यार्थी देखील होते. या बसमध्ये एकूण 46 प्रवासी होते. मृतांमध्ये सहा महिला आणि तीन लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर या घटनेची माहिती मिळताच सरकानं मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मंत्रालयाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 100,000 इजिप्शियन पौंड मदतीची घोषणा केली आहे.