एक्स्प्लोर

दुबईचा झगमगाट अन् छमछमाट आवडे सर्वांना, पण इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्ससह परदेशी तरुणींना काय काय करायला लावलं जातं? दोन प्रकरणांनी अंगावर शहारे!

दुबईतील सेक्स ट्रॅफिकिंग रॅकेट उघड; महिलांना खोट्या आश्वासनांनी गुलामीत ढकलले जाते, विकेंडसाठी $5,000–$50,000 पर्यंत पैसे दिले जात आहेत.

Dubai Dark Secret: दुबईच्या (sex trafficking ring) चमचमीत आभाळाखाली तरुण आणि महिलांच्या यातनांचा काळोख दडत चालला आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आलिशान गाड्या, गगनचुंबी इमारती आणि लक्झरी पार्टींच्या आभासामागे महिलांसह तरुणींच्या देहाचा व्यापार जोरदार सुरु  सुरू असल्याचे समोर आलं आहे. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या धक्कादायक तपासणीत उघडकीस आलेल्या सेक्स ट्रॅफिकिंग रॅकेटने (UAE human trafficking scandal) खोट्या आश्वासनांनी महिलांना गुलामीत ढकलल्याचे स्पष्ट केले आहे. हॉटेल वा सुपरमार्केटमध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांना दुबईत आणले जाते, मग कैद करून जबरदस्तीने सेक्स पार्ट्यांमध्ये ढकलले जाते. यात आफ्रिकन देशांतील महिला (Dubai sex trafficking African women) मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. दोन महिलांचा संशयास्पद मृत्यू हा या निर्दयी व्यवस्थेचा पुरावा आहे, तरीही अधिकृत नोंदींमध्ये तो आत्महत्येचा ठरवला गेला आहे. पैशांच्या बदल्यात degradation स्वीकारण्यास भाग पाडल्या जाणाऱ्या या स्त्रिया फक्त उपभोगासाठी ठरत आहेत. दुबईच्या चमकदार ब्रँडिंगमागे लपलेल्या या काळ्या वास्तवाने आंतरराष्ट्रीय पटलावर गल्फमधील महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कायदे असूनही कारवाई नसल्याने अत्याचार करणाऱ्यांना बळ मिळते.

लैंगिक तस्करी आणि शोषण (Dubai Instagram influencers exploitation) 

बीबीसी (BBC) वर्ल्ड सर्व्हिस डॉक्युमेंटरीने संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील एका लैंगिक तस्करी रॅकेटचा (sex trafficking ring) पर्दाफाश केला आहे, ज्यात परदेशी महिलांचे शोषण केले जाते. दुबईमध्ये लैंगिक तस्करीचा उद्योग वाढत असल्याचे आणि त्यात विशेषतः आफ्रिकन महिलांना त्रास दिला जातो, असे 2023 च्या रॉयटर्सच्या तपासात म्हटले आहे. Dubai PortaPotty ही डॉक्युमेंटरी #DubaiPortaPotty नावाची आहे. जी आता UAE मध्ये एक उघड गुपित बनली आहे. यामध्ये इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्ससह (Instagram influencers) इतर महिलांना अपमानास्पद लैंगिक कृत्ये करण्यासाठी आणि मानवी शौचालय (human toilets) म्हणून काम करण्यासाठी भरमसाठ पैसा मोजला जातो. 

महिलांना कसे फसविले जाते? (Women forced into sex parties in Dubai) 

अनेक महिलांना हॉटेल्स आणि सुपरमार्केटमध्ये नोकरीच्या खोट्या बहाण्याने देशात आणले जाते. त्यानंतर, त्यांना तुरुंगात डांबून आणि जबरदस्तीने या कामासाठी भाग पाडले जाते. या रॅकेटसाठी काम करणाऱ्या दोन युगांडाच्या महिला, मोनिक करउनगी आणि कायला बिरुंगी, यांचा दुबईतील इमारतींवरून पडून मृत्यू झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी या दोन्ही मृत्यूंना आत्महत्या ठरवले, परंतु त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की या प्रकरणांची योग्य चौकशी झाली नाही. बीबीसीने (BBC) प्रयोगशाळेतील चाचण्यांची पडताळणी केली ज्यात असे दिसून आले की बिरुंगीच्या रक्तात अल्कोहोल किंवा ड्रग्सचे कोणतेही अंश नव्हते, जरी तसा दावा करण्यात आला होता.

महिलांना एका विकेंडसाठी 5,000 ते 50,000 डॉलर्स (Wealthy clients Demand) 

तपासणीत असे दिसून आले की, श्रीमंत व्यावसायिक आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होणारे उच्चभ्रू ग्राहक महिलांना मोठ्या रकमा देऊन अपमानास्पद कृत्ये करवून घेतात. काही महिला स्वेच्छेने, तर अनेकांना खोट्या नोकरीच्या आश्वासनांवर दुबईत बोलावून जबरदस्तीने या पार्ट्यांमध्ये ढकलले जाते. अहवालांनुसार, महिलांना एका विकेंडसाठी 5,000 ते 50,000 डॉलर्सपर्यंत पैसे दिले जातात, मात्र दलाल किंवा टोळ्यांकडून बहुतेक रक्कम हिसकावली जाते. या पार्ट्यांमध्ये महिलांना अश्लील आणि अमानवीय वर्तन सहन करावे लागते. काही प्रकरणांत महिलांचा मृत्यूही संशयास्पदरीत्या झाला आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, लैंगिक तस्करीसाठी कठोर तुरुंगवासाची शिक्षा असूनही, अमिरातीचे अधिकारी या महिलांचे संरक्षण करण्यासाठी फारसे काही करत नाहीत. दुसरीकडे, UAE च्या परराष्ट्र मंत्रालयाने मानवी तस्करीला सहन केले जात असल्याचे दावे निराधार असल्याचे म्हटले आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या (US State Department) 2023 च्या अहवालानुसार, संयुक्त अरब अमिराती (UAE) सरकार तस्करीच्या निर्मूलनासाठी किमान मानकांची पूर्णपणे पूर्तता करत नाही, परंतु तसे करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indigo Airlines: इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले
इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले
शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पण पार्थ पवारवर 1800 कोटींची सरकारी जमीन खाऊनही कारवाई होत नाही, एफआयआरमध्ये नाव नाही; अंजली दमानियांचा संतापाचा उद्रेक
शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पण पार्थ पवारवर 1800 कोटींची सरकारी जमीन खाऊनही कारवाई होत नाही, एफआयआरमध्ये नाव नाही; अंजली दमानियांचा संतापाचा उद्रेक
IND vs SA 2nd ODI Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 358 धावांचा डोंगर, पण 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 358 धावांचा डोंगर, पण 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव
Parth Pawar Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी; पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी; पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

IAS Fake Officer : बोगस IAS अधिकाऱ्यांच्या जाळ्यात बडे मासे Chhatrapati Sambhajinagar Special Report
Nashik Tapovan Tree Cutting : कुंभमेळा आणि तपोवन, महायुतीत राजकारण Special Report
Maharashtra Flood Help : अतिवृष्टी अहवाल...खरं कोण, खोटं कोण? Special Report
Amruta Fadnavis On Devendra Fadnavis : युतीचा घटस्फोट, नवा गोप्यस्फोट Special Report
Sangli Ashta EVM Scam : वाढला टक्का, सांगलीत खटका; मतदानामध्ये तफावत, राजकीय आफत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indigo Airlines: इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले
इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले
शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पण पार्थ पवारवर 1800 कोटींची सरकारी जमीन खाऊनही कारवाई होत नाही, एफआयआरमध्ये नाव नाही; अंजली दमानियांचा संतापाचा उद्रेक
शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पण पार्थ पवारवर 1800 कोटींची सरकारी जमीन खाऊनही कारवाई होत नाही, एफआयआरमध्ये नाव नाही; अंजली दमानियांचा संतापाचा उद्रेक
IND vs SA 2nd ODI Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 358 धावांचा डोंगर, पण 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 358 धावांचा डोंगर, पण 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव
Parth Pawar Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी; पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी; पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार
Pune News: आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
Land Scam Pune Who Is Sheetal Tejwani: पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहारातील मोठा मासा; पोलिसांकडून अटक, जमीन विकणारी शीतल तेजवानी कोण?
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहारातील मोठा मासा; जमीन विकणारी शीतल तेजवानी कोण?
Rohit Pawar: रोहित पवार हाजीर हो... माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणात नाशिक न्यायालयाकडून हजर राहण्याचे आदेश
रोहित पवार हाजीर हो... माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणात नाशिक न्यायालयाकडून हजर राहण्याचे आदेश
Dombivli Reel Star Shailesh Ramugade Case: आधी मैत्री, मग प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, अन्...; डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध 'रिलस्टार'नं एकीला 92 लाखांना, तर दुसरीला 22 लाखांना लुबाडलं
आधी मैत्री, मग प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, अन्...; डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध 'रिलस्टार'नं एकीला 92 लाखांना, तर दुसरीला 22 लाखांना लुबाडलं
Embed widget