Dubai: कागदाचा वापर 100 टक्के बंद, दुबई जगातील पहिले पेपरलेस शहर
Paperless City: संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) युवराज आणि दुबईचे क्राऊन प्रिंन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी ही माहिती दिलीय.
Paperless City: दुबई (Dubai) सरकार 100 टक्के पेपरलेस होणारे पहिलं शहर ठरलंय. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) युवराज आणि दुबईचे क्राऊन प्रिंन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी ही माहिती दिलीय. दुबई सरकारला या धोरणाचा खूप फायदा होणार आहे. या धोरणेमुळं पैशांबरोबरच मनुष्यबळाचीही बचत होणार आहे. एवढेच नव्हेतर, पेपरलेस धोरणामुळं 1.3 अरब दिहरम (35 कॉटी डॉलर) आणि 1 कोटी 40 लाख श्रमतासांची बचत झालीय. दुबई सरकारने सर्व अंतर्गत, बाह्य व्यवहार आणि प्रक्रिया आता 100 टक्के डिजिटल झाल्या आहेत. सर्वसमावेशक डिजिटल सरकारी सेवा संस्थेद्वारा त्याचे कामकाज पाहिले जाते आहे.
शेख हमदान यांनी म्हटलंय की, दुबईतील सगळ्या गोष्टींचे डिजिटलायझेशन करणे ही एका नव्या प्रवासाची, टप्प्याची सुरूवात आहे. नावीन्य, कलात्मकता आणि भविष्यावर लक्ष केंद्रीत करणे, हा या प्रवासाचा आधार आहे. सर्वसमावेशक डिजिटल सरकारी सेवा संस्थेद्वारा त्याचं कामकाज पाहिलं जातंय. शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्व 45 सरकारी संस्थांमध्ये पेपरलेस धोरण थाबवण्यात येणार आहे.
पेपरलेस धोरणांचा दुबईच्या सरकारला मोठा फायदा होईल. दुबईच्या क्राउन प्रिन्सने याला एका नव्या युगाची सुरुवात म्हटलंय. येत्या 5 दशकात सरकार डिजिटल सेवांचे आधुनिकीकरण आणि सुविधा देण्यासाठी काम करेल, असेही त्यांनी म्हटलंय. पेपरलेस धोरणामुळं पैशांसह मनुष्यबळाचीही बचत होईल. या धोरणंमुळं दुबईच्या सरकारचे दरवर्षी 2700 कोटी रुपयांची बचत होऊ शकते. या उपक्रमाचा 2018 साली पाया रचला गेला. पर्यावरणाच्या दृष्टीनेही हे मोठे पाऊल असल्याचं मानलं जातंय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha