Pfizer COVID Pill : दिलासादायक! फायझर टॅबलेटच्या आपत्कालीन वापराला मंजुरी, ओमायक्रॉनवरही प्रभावी
Pfizer COVID Pill : युरोपियन युनियनच्या औषध नियामक विभागाने फायझरच्या (Pfizer) कोविड टॅबलेटच्या (Covid Pill) आपत्कालीन वापराला परवानगी दिलीय. ही टॅबलेट ओमायक्रॉनवरही प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा आहे.
Pfizer COVID Pill : फायझरच्या (Pfizer) कोविड टॅबलेटच्या (Covid19 Pill) आपत्कालीन वापराला युरोपियन युनियन औषध नियामक (EU Drug Regulator) विभागाने मंजुरी दिली आहे. युरोपियन युनियनच्या औषध नियामक विभागाने कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटशी (Omicron Variant) दोन हात करण्यासाठी फायझरच्या कोविड टॅबलेटच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सीने (EMA) जी युरोपियन युनियन (EU) साठी औषधी उत्पादनांच्या मूल्यमापन आणि पर्यवेक्षणाची जबाबदारी घेते, त्यांनी सदस्य राज्यांमध्ये फायझर कोविड टॅबलेट आपत्कालीन वापरासाठी मंजूर केली आहे. आपत्कालीन वापरास परवानगी मिळणार ही दुसरी टॅबलेट ठरली आहे. या आधीच युरोपियन मेडिसिन एजन्सीने मर्क (Merck) च्या कोविड टॅबलेटसाठी आणीबाणीच्या वापरास मान्यता दिली आहे.
अमेरिकन औषध कंपनी फायझरने दावा केला आहे की, ''फायझरची कोविड टॅबलेट ओमायक्रॉन व्हेरियंटवर प्रभावी आहे. या टॅबलेटचा वापर करुन रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण आणि कोरोनाबळींची संख्या कमी करण्यास 90 टक्के परिणामकारक ठरेल.''
युरोपियन मेडिसिन एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, "फायझरची कोविड टॅबलेट अद्याप युरोपियन युनियनमध्ये वापरास परवानगी नाही. मात्र या टॅबलेटचा वापर प्रौढांवर कोरोना उपचार करण्यासाठी केला जाऊ शकते. ज्या रुग्णांना पूरक ऑक्सिजनची आवश्यकता नाही आणि ज्यांना गंभीर आजार होण्याचा धोका वाटतो, अशा कोरोना रुग्णांवरील उपचारात फायझर कोविड टॅबलेट वापरण्यास मंजुरी आहे." एका रिपोर्टनुसार युरोपियन मेडिसिन एजन्सीने हा सल्ला राष्ट्रीय अधिकार्यांना पाठिंबा देण्यासाठी जारी केला आहे जे औषधाच्या संभाव्य वापराचा वापराचा निर्णय घेऊ शकतात.
गोळीमध्ये पॅक्सलोविड (Paxlovid) हे नवीन रेणू PF-07321332 आणि HIV अँटीव्हायरल रिटोनावीर (Ritonavir) यांचे संयोजन आहे, जे वेगळ्या टॅबलेट म्हणून घेतल्या जाते. युरोपियन मेडिसिन एजन्सीने म्हटले आहे की, कोविड-19 चे निदान झाल्यानंतर आणि लक्षणे दिसू लागल्यानंतर पाच दिवसांच्या आत पॅक्सलोविडचा वापर शक्य तितक्या लवकर करावा. अशावेळी फायझरच्या टॅबलेट आणखी पाच दिवस घ्याव्यात.
काय आहेत दुष्परिणाम?
फायझरच्या कोविड टॅबलेटचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. चव कमी होणे, जुलाब किंवा उलट्या होणे किंवा तसा भास होणे, असे काही सौम्य दुष्परिणाम जाणवू शकतात. गर्भवती महिलांनी या टॅबलेट वापरु नयेत आणि ते घेत असल्यास स्तनपान थांबवावे.
महत्त्वाच्या बातम्या :
- कोरोनावरील उपचारासाठी आणखी एक 'अस्त्र'; 'या' देशाने दिली गोळीला मंजुरी
- NDA Exam Result 2021 : शाब्बास पोरींनो! एक हजार मुली NDAची परीक्षा पास, आता कठोर चाचण्या मग निवड...
- Trending : भारतीय तरुणाने दाखवल्या गुगलमधल्या त्रुटी, जिंकले 3.5 लाख रुपये
- कर्नाटक काँग्रेस आमदाराचे विधानसभेत वादग्रस्त टिप्पणी, बलात्कारापासून बचाव करता येत नसेल तर...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha