'पाकिस्तान झाला दिवाळखोर'; पाकिस्तानच्या माजी अधिकाऱ्याचा मोठा दावा
Pakistan Bankruptcy : 'पाकिस्तान दिवाळखोर झाला आहे', असा दावा माजी फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू चेअरमन प्रमुख झैदी यांनी केला आहे. तर परिस्थिती चांगली असल्याचा दावा पाकिस्तान सरकारकडून करण्यात येतोय.
Pakistan Bankruptcy : 'पाकिस्तान दिवाळखोर झाला आहे', असा दावा फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे (FBR) माजी अध्यक्ष झैदी यांनी केला आहे. मात्र पाकिस्तानची चांगले काम करत असून परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा दावा पाकिस्तान सरकारकडून करण्यात येतोय. शब्बर जैदी यांनी सरकारचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानच्या फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे माजी अध्यक्ष शब्बर झैदी यांनी म्हटले आहे की, ''आपला देश दिवाळखो झाला आहे आणि भ्रमात जगण्यापेक्षा वास्तव ओळखणे चांगले आहे.'' बुधवारी हमदर्द विद्यापीठात एका चर्चासत्राला संबोधित करताना ते म्हणाले की, सरकारमधील प्रत्येकजण सर्व काही ठीक आहे असे म्हणत आहे, तर त्यांच्या मते पाकिस्तान सध्या दिवाळखोर आहे.
झैदी म्हणाले की त्यांचा विश्वास आहे की, 'या क्षणी देश दिवाळखोर आहे.' झैदी म्हणाले की, 'उपाय शोधण्यापेक्षा देशाची अर्थव्यवस्था दिवाळखोर झाली आहे हे स्वीकारणे चांगले आहे.' 'देशाचे भले होत असल्याचा दावा करुन जनतेची फसवणूक करण्यापेक्षा त्यावर उपाय शोधून देशाला दिवाळखोर समजणे योग्य ठरेल', असे ते म्हणाले.
दरम्यान, त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर, झैदी यांनी स्पष्टीकरण देण्यासाठी ट्विट केले की त्यांचे शब्द संदर्भासह पाहिले गेले नाहीत आणि चुकीचे वर्णन केले गेले. दिवाळखोरी आणि चिंतेचे मुद्दे असल्याचे त्यांनी सांगितले होते. याला सहमती दर्शवत झैदी म्हणाले की, आपण उपायांकडेही लक्ष दिले पाहिजे.
झैदी यांनी 10 मे 2019 ते 8 एप्रिल 2020 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारमध्ये फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे (FBR) अध्यक्ष म्हणून काम केले. हमदर्द विद्यापीठात नुकत्याच झालेल्या भाषणात त्यांनी आपले मत मांडताना हे वादग्रस्त विधान केले. मात्र, आता त्या विधानाशी संबंधित व्हिडिओबाबत झैदी यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या भाषणाच्या केवळ तीन मिनिटांच्या क्लिपबद्दल बोलले जात असून, पुढील तोडगाही बोलून दाखवला, मात्र त्याकडे कोणी लक्ष दिलेले नाही, असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
- Bhutan Civilian Award : पंतप्रधान मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय सन्मान; भूतानकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार
- Pfizer COVID Pill : दिलासादायक! फायझर गोळीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी, ओमायक्रॉनवरही प्रभावी
- Trending : भारतीय तरुणाने दाखवल्या गुगलमधल्या त्रुटी, जिंकले 3.5 लाख रुपये
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha