Omicron Variant : अमेरिकेत अलर्ट! 'बूस्टर डोस घ्या', राष्ट्राध्यक्ष बायडन यांचे आवाहन
Omicron Variant : ओमायक्रॉन व्हेरियंट अमेरिकेत खूप वेगाने पसरू शकतो. या परिस्थितीत बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण आणि बूस्टर डोस, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले आहे.
Omicron Variant : कोविड-19 (Covid19) चे ओमायक्रॉन व्हेरियंट जगभरात वेगाने पसरत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनीही ओमिक्रॉनबद्दल चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपल्या देशातील नागरिकांना ओमायक्रॉनपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, कोरोना विषाणूचे ओमायक्रॉन देशात वेगाने पसरु शकते. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी लसीकरणाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.
जो बायडन यांनी जनतेला दिला सावधगिरीचा इशारा
राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, ''कोरोना विषाणूचे ओमायक्रॉन व्हेरियंट अमेरिकेत वेगाने पसरण्यास सुरुवात होईल. अशा परिस्थितीत यापासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण. हा गंभीर आजार टाळता यावा यासाठी सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करावे.'' त्यांनी आवाहन केले आहे की, ''यामध्ये कोणताही निष्काळजीपणा होता कामा नये.'' यासोबतच लसीकरण झालेल्यांना बूस्टर डोस देण्याचे महत्त्वही त्यांनी सांगितले.
यापूर्वी व्हाईट हाऊसचे उप प्रवक्ते कॅरिन जीन-पियरे यांनी सुचवले होते की, ''प्रशासनाने सध्या विशिष्ट प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यापेक्षा लसीकरणावर भर द्यावा. ओमायक्रॉनबाबत संबंधित विभाग योग्य दिशेने काम करत असून अधिकाधिक अमेरिकन लोकांना लसीकरणाबाबत जागरुक केले जात आहे. यासोबतच बूस्टर डोसबाबतही प्रचार करण्यात येत आहे.''
दरम्यान, जी7 आरोग्य मंत्र्यांनी गुरुवारी ओमायक्रॉन व्हेरियंटच्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त करत आंतरराष्ट्रीय सहकार्याचे आवाहन केले आहे. G7च्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, ''सध्या जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका आहे. नवीन प्रकाराशी संबंधित उद्रेक जागतिक स्तरावर पसरला आहे आणि अधिक युरोपियन देश प्रवासी निर्बंध लागू करत आहेत.''
महत्त्वाच्या बातम्या :
- 'पाकिस्तान झाला दिवाळखोर'; पाकिस्तानच्या माजी अधिकाऱ्याचा मोठा दावा
- Bhutan Civilian Award : पंतप्रधान मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय सन्मान; भूतानकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार
- Pfizer COVID Pill : दिलासादायक! फायझर गोळीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी, ओमायक्रॉनवरही प्रभावी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha