एक्स्प्लोर
हॅलो, मिस्टर मोदी.... डोनाल्ड ट्रम्प थेट मोदींना फोन करणार, वेळ ठरली
नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज फोनवरुन बातचित होणार आहे. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार आज दुपारी एक वाजता तर भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साधारण 11.30 वाजता हे दोन्ही नेते एकमेकांशी फोनवरुन संवाद साधणार आहेत.
20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. त्यानंतर आतापर्यंत ट्रम्प यांनी 4 देशांच्या पंतप्रधानांशी आणि राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून संवाद साधला आहे. त्यानंतर मोदी हे पाचवे पंतप्रधान ठरणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जगातील ज्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले, त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचाराच्या काळात ट्रम्प भारताविषयी म्हणाले होते की, "अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यानंतर भारतासोबतची मैत्री आणखी दृढ कशी होईल, याकडे लक्ष दिले जाईल." या सर्व पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये नक्की काय चर्चा होते, याकडे भारत आणि अमेरिकेसह जगाचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement