Corona Vaccine | जागतिक आरोग्य संघटनेकडून Pfizer-BioNTech लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी
जागतिक आरोग्य संघटनेने Pfizer-BioNTech लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी दिली आहे. कोरोना महामारी आल्यानंतर संघटनेकडून इमर्जन्सी वापराला मंजुरी देण्यात आलेली फायजर-बायोटेक ही पहिलीच लस आहे.
![Corona Vaccine | जागतिक आरोग्य संघटनेकडून Pfizer-BioNTech लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी Corona Vaccine- WHO announces validation of Pfizer BioNTech vaccine for emergency use Corona Vaccine | जागतिक आरोग्य संघटनेकडून Pfizer-BioNTech लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/01121410/Pfizer-BioNTech-Vaccine.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी (31 डिसेंबर) फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी दिली आहे. कोरोना महामारीनंतर डब्लूएचओकडून एखाद्या लसीला मंजुरी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. डब्लूएचओच्या या निर्णयानंतर अनेक देशांसाठी मार्ग मोकळा झाला आहे की, ते फायजर-बायोटेक लसीच्या आयातीला मंजुरी देऊन वितरणाला सुरुवात करतील.
ब्रिटनने सर्वात आधी म्हणजेच 8 डिसेंबरला या लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन युनियनच्या देशांनीही या लसीच्या वापराला मंजुरी दिली होती.
डब्लूएचओने म्हटलं आहे की, कोरोना महामारी आल्यानंतर संघटनेकडून इमर्जन्सी वापराला मंजुरी देण्यात आलेली फायजर-बायोटेक ही पहिलीच लस आहे. "कोरोना लसीची जागतिक पोहोच सुनिश्चित करण्यासाठी हे एक अतिशय सकारात्मक पाऊल आहे," असं डब्लएचओचे वरिष्ठ अधिकारी मॅरिएंगेला सिमाओ यांनी म्हटलं.
डब्लूएचओने आपल्या आणि जगभरातील तज्ज्ञांद्वारे फायजर लसीच्या 'सुरक्षा, प्रभावी आणि गुणवत्तेच्या माहितीची पडताळणी केली. याचे फायदे आणि जोखिमांचं मूल्यांकन केलं. डब्लूएचओने निश्चित केलेल्या सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या निकषावर ही लस परिणामकार ठरते, असं त्यांनी सांगितलं.
भारतात लवकरच कोरोना लस येण्याची शक्यता केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमटीची आज कोरोना लसीसंदर्भात बैठक आहे. ज्यांनी इमर्जन्सी यूज ऑथोरायझेशनची परवानगी मागितली आहे अशा तीन कंपन्यांच्या डेटाचं पुनरावलोकन या बैठकीत होणार आहे. या समितीच्या शिफारशीवर डीसीजीआय निर्णय घेणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि फायजरने इमर्जन्सी वापरासाठी मंजुरी मागितली आहे.
आता कोणत्या कोरोना लसीला पहिल्यांदा मंजुरी मिळणार हे अजून स्पष्ट नाही. परंतु भारत सरकारने यासाठी तयारी पूर्ण केली आहे. कोल्ड स्टोअरेजपासून वॅक्सिनेटरचं प्रशिक्षण आणि ज्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे त्यांची माहिती जमा केली आहे. पहिल्या टप्प्यात ही लस तीस कोटी नागरिकांना दिली जाईल, ज्यासाठी प्राथमिकता निश्चित केली आहे.
सर्वात आधी आरोग्य कर्माचारी, मग फ्रण्टलाईन कर्मचाकी आणि त्यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या तसंच 50 वर्षांखालील वयाचे लोक ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांना ही लस दिली जाईल. यासंदर्भात चार राज्यांमध्ये दोन दिवसांचं ड्राय रनही करण्यात आलं आहे. तर उद्यापासून म्हणजेच 2 जानेवारीला सर्व राज्यांमध्ये एक दिवसाचं ड्राय रन केलं जाईल.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)