WHO ची भविष्यवाणी खरी ठरणार! 73 वर्षे जुना विषाणू पुन्हा आला, चीनमध्ये 7000 लोक बळी पडले
China Virus:डासांद्वारे पसरणाऱ्या या विषाणूमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ माजली आहे. फोशान शहर सर्वाधिक प्रभावित असून, या ठिकाणी कोविड काळातील उपाययोजनांची आठवण करणारी पावलं उचलली जात आहेत.

China Virus: सुमारे 20 वर्षांपूर्वी जगभरात कहर करणारा हा विषाणू पुन्हा एकदा परतला आहे. या विषाणूचे नाव चिकनगुनिया आहे. गेल्या काही महिन्यांत चिकनगुनिया विषाणूला रियुनियन, मेयोट आणि मॉरिशस सारख्या बेटांवरून मादागास्कर, सोमालिया आणि केनिया सारख्या आफ्रिकन देशांमध्ये पसरला आहे. आता तो चीनमध्ये वेगाने पसरत आहे.
चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात चिकनगुनिया विषाणूचा प्रकोप वाढत असून, जुलैपासून आतापर्यंत 7,000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. डासांद्वारे पसरणाऱ्या या विषाणूमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ माजली आहे. फोशान शहर सर्वाधिक प्रभावित असून, या ठिकाणी कोविड काळातील उपाययोजनांची आठवण करणारी पावलं उचलली जात आहेत.
फोशानमध्ये चिकनगुनियाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्येच ठेवले जात असून, त्यांच्यासाठी खास जाळी लावून डासांपासून संरक्षण केले जात आहे. रुग्णांना 8 दिवसांनंतर किंवा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच डिस्चार्ज दिला जातो. चिकनगुनिया विषाणू संक्रमित डासांच्या चाव्याने पसरणारा आजार आहे. यामुळे ताप, पुरळ आणि तीव्र सांधेदुखी होते, जी काही वेळा महिन्यांनंतरही थांबत नाही.
जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गेल्या महिन्यात इशारा दिला होता की चिकनगुनिया आशियाई देशांपासून ते युरोपपर्यंत कहर करू शकतो. सध्या आशिया आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये त्याचे रुग्ण सतत वाढत आहेत. WHO ने म्हटले होते की सध्या 119 देशांमधील सुमारे ५६० कोटी लोकांना चिकनगुनिया संसर्गाचा धोका आहे. दरवर्षी केवळ चीनमध्येच नाही तर भारतातही चिकनगुनियाचे रुग्ण आढळतात. पावसाळ्यात डास वाढतात आणि चिकनगुनिया विषाणू देखील अधिक पसरू लागतो. २००५ मध्ये चिकनगुनियाने साथीचे रूप धारण केले आणि नंतर हा आजार हिंद महासागरातील लहान बेटांपासून सुरू झाला आणि ५ लाखांहून अधिक लोकांमध्ये पसरला. क्वचित प्रसंगी, चिकनगुनिया अपंगत्व आणू शकतो.
ग्वांगडोंगमध्ये किती गंभीर आहे स्थिती?
फोशानसह ग्वांगडोंगमधील 12 हून अधिक शहरांमध्ये चिकनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्यातच 3,000 नवीन रुग्ण नोंदवले गेले. याशिवाय, हॉंगकॉंगमध्ये देखील पहिला रुग्ण सापडला आहे, जो फोशानहून परतलेल्या 12 वर्षीय मुलाचा आहे. हा आजार एकमेकांमध्ये थेट पसरत नाही. मात्र संक्रमित व्यक्तीला डास चावल्यास आणि तोच डास दुसऱ्याला चावल्यास प्रसार होतो. प्रशासनाने सांगितले की सध्या आढळलेले 95% रुग्ण सौम्य स्वरूपाचे आहेत आणि 7 दिवसांत बरे होतात. मात्र, नागरिकांमध्ये घबराट वाढली आहे.
प्रशासनाने उचलली काय पावलं?
ताप, सांधेदुखी आणि पुरळ दिसल्यास तातडीने टेस्ट करण्याचे आवाहन
घरातील साचलेले पाणी हटवण्याचे आदेश, न केल्यास 10,000 युआन (₹1,400) दंड
"हत्ती डास" (Elephant mosquitoes) सोडून लहान डासांचा नाश
तलावात 5,000 अळीखाऊ मासे सोडले
ड्रोनच्या साहाय्याने साचलेल्या पाण्याचा शोध
चिकनगुनिया म्हणजे काय?
1952 मध्ये टांझानियामध्ये प्रथम आढळलेला चिकनगुनिया आज 110 हून अधिक देशांत आहे. यावर ठोस उपचार नाहीत, पण मृत्यू दुर्मिळ असतो. लक्षणांमध्ये ताप, पुरळ, सांधेदुखी, स्नायुदुखी असते. वृद्ध, नवजात बालकं, मधुमेह-हृदयरोग असलेल्यांना अधिक धोका असतो.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























