एक्स्प्लोर
Advertisement
वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट 2 ऑक्टोबरपर्यंत रद्द
नवी दिल्ली: वाघा बॉर्डरवर होणारं बीटिंग रिट्रीट 2 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आलं आहे. आज लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
वाघा बॉर्डरवर दररोज संध्याकाळी बीटिंग द रिट्रीट पाहण्यासाठी दोन्ही देशाचे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. दररोज मोठ्या जल्लोषात इथं बीटिंग रिट्रीट होत असतं. पण सध्या दोन्ही देशातील सीमेरेषेवर प्रचंड तणाव वाढला आहे. त्यामुळे भारत सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
सीमारेषेवरील तणाव वाढला असल्याने त्याचे सर्वच ठिकाणी प्रतिसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. त्याचाच भाग म्हणून आता बीटिंग रिट्रीट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीटिंग रिट्रीट म्हणजे काय
वाघा बॉर्डरवर रोज सायंकाळी दोन्ही देशाचे झेंडे उतरवले जातात. यावेळी दोन्ही देशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. त्यावेळी दोन्हीकडचे जवान अतिशय उत्साहात बॉर्डरपर्यंत मार्च करतात. मानवंदना देऊन आपले राष्ट्रध्वज खाली उतरवतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement