California Shooting: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये अंदाधुंद गोळीबार; 6 जण ठार, 9 हून अधिक जखमी
American: अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याची राजधानी सॅक्रामेंटो येथे गोळीबारात झाल्याची घटना घडली आहे.
American: अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याची राजधानी सॅक्रामेंटो येथे गोळीबारात झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात सहा जण ठार, तर किमान नऊ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सॅक्रमेंटो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी हा गोळीबार झाला. याचाच एक व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. ट्वीटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लोक रस्त्यावर धावताना दिसत आहेत. तर त्यांच्यामागून गोळीबाराचा आवाज ऐकू येत होता. घटनास्थळावरून अनेक रुग्णवाहिकाही जाताना दिसत आहे.
अद्याप पोलिसांनी या घटनेची पूर्ण माहिती दिलेली नाही. परंतु घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळवण्यासाठी फोनवरून सॅक्रामेंटो पोलिसांशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ज्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडली, त्या ठिकाणी अनेक रेस्टॉरंट आणि बार आहेत. लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे.
ADVISORY: 9th St to 13th St is closed between L St & J St as officers investigate a shooting with multiple victims. Conditions unknown at this time. Please avoid the area as a large police presence will remain and the scene remains active. Please follow this thread for updates. pic.twitter.com/lGhUJCnLWe
— Sacramento Police (@SacPolice) April 3, 2022
या घटनेची माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते बेरी ओकुईस यांनी सांगितले की, त्यांनी गोळीबारानंतर लगेच घटनास्थळी धाव घेतली. ते म्हणाले, “मी अनेक जखमी लोक पाहिली. एका मुलीच्या अंगातून रक्त वाहत होते. एक मुलगी आपल्या बहिणीला गोळ्या लागल्याचे ओरडत होती. एक स्त्री आपल्या मुलाचा शोध घेत होती.'' दरम्यान, नेमका हा गोळीबार कोणी केला, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :