एक्स्प्लोर

Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती

Benjamin Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी तीन लग्न केले, शिवाय अनेकदा ते प्रेम प्रकरणांमुळेही चर्चेत राहिले आहेत.

Benjamin Netanyahu : हिजबुल्लाह  संघटनेचा प्रमुख नसरल्लाह आणि आणखी एका मोठ्या कमांडरचा खात्मा केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांची लोकप्रियता देशात आणखी वाढली आहे. गेल्या वर्षभरापासून नेत्यानाहू यांनी देशाला युद्धाच्या आगीत ढकलले असल्याचे बोलले जाते. आत्तापर्यंत इस्रायलची जनता नेत्यानाहू यांच्यावर नाराज होती, मात्र आता इस्रायलची हवा बदलली असल्याचे बोलले जाते. 

सध्या नेत्यानाहू इस्रायलमध्ये ताकदवर नेते बनले आहेत. दीड वर्षांपूर्वी नेत्यानाहू यांना निवडणूक जिंकणे कठीण बनले होते. मात्र, आता त्यांची ताकद वाढलीये. नेत्यानाहू सर्वात जास्त काळ इस्रायलचे पंतप्रधान राहिले आहेत. त्यांची कारकीर्द लग्न, प्रेम प्रकरण आणि सेक्स व्हिडीओने देखील गाजलीये. 

नेत्यानाहू यांनी 18 वर्षांचे असताना सैन्य दलात कमांडो बनणे पसंत केले होते. त्यांनी सैन्यातील अनेक धैर्यवान अभियानांमध्ये सहभाग नोंदवला होता. यामध्ये सर्वांत मोठे अभियान “आपरेशन गिफ्ट” म्हणून ओळखले जाते. जेव्हा ते बेरुन विमानतळावर इस्रायलच्या लोकांची सुटका करण्यासाठी कमांडो टीममध्ये होते. 

नेत्यानाहू यांचे पहिले प्रेम 

नेत्यानाहू यांचं व्यक्तीमत्व इस्रायलच्या लोकांना आकर्षक वाटते , असेही बोलले जाते. त्यांच्या व्यक्तीमत्वाची मोहिनी पहिल्यांदा मरियम वीजमन हिच्यावर पडली. दोघांची लव्हस्टोरी सैन्यात असतानाच सुरु झाली होती. दोघांमधील प्रेमाची जोरदार चर्चा होती. तेव्हा मरियम देखील सैन्यात प्रशिक्षण घेत होती. दोघं काही वेळेस भेटले आणि त्यानंतर एकमेकांच्या प्रेमात गुंतले होते. सैन्यातील प्रशिक्षण संपल्यानंतर दोघे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले होते. मरियम देखील नेत्यानाहू यांच्याच वयाच होती. दोघेही त्याकाळी सुंदर असल्याचे बोलले जाते. त्यांनी अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 

1978 मध्ये मरियम प्रेग्नंट झाला होती. सर्वकाही सुरळीत सुरु असताना नेत्यानाहू अमेरिकेत शिक्षणासाठी गेले. दरम्यानच्या काळात त्यांची ओळख ब्रिटनच्या फ्लेर कैट्स हिच्याशी झाली. दोघांचे अफेअर अमेरिकेत सुरु झाले होते. 

नेत्यानाहू आणि मरियमचा घटस्फोट 

एके दिवशी जेव्हा मरियमला ​​नेतन्याहूच्या सूटवर लांब केस दिसले. त्यानंतर तिने स्वतः जाऊन नेतान्याहू यांना रंगेहात पकडले. पती आणि पत्नीमध्ये प्रचंड वाद झाला. त्यानंतर त्याच्या पहिल्या पत्नीने त्याला घराबाहेर हाकलून दिले. जेव्हा एप्रिल 1978 मध्ये मरियमने अमेरिकेतील एका हॉस्पिटलमध्ये मुलगी नोहाला जन्म दिला. तेव्हा नेतान्याहू तेथे उपस्थित नव्हते. दोघेही वेगळे राहू लागले. त्यानंतर घटस्फोटही झाला.

दुसरे लग्न फक्त तीन वर्षे टिकले

नेत्यानाहू यांचा ब्रिटनच्या मुलीशी अफेर केल्यामुळे घटस्फोट झाला. त्याच मुलीशी त्यांनी विवाह केला. नेत्यानाहू यांनी  1981 ब्रिटनच्या मुलीशी लग्न केले. मात्र, त्यांचं हे लग्न केलळ तीन वर्षे टिकले. 1984 मध्ये या दोघांचा विवाह झाला. दोघांच्या विवाहामध्ये त्यांचे नेत्यानाहू यांच्या घरचे लोकही खूश नव्हते. कारण दुसरी पत्नी यहुदी नव्हती. 

दरम्यान, नेतान्याहू यांनी पुन्हा प्रगती करण्यास सुरु केली. त्यांनी राजकारणात मजबूत स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली. 1992 मध्ये खासदार झाले. पक्षाने निवडणूक जिंकली तेव्हा त्यांची पंतप्रधानपदी निवड झाले. 

तिसरी पत्नी एअर होस्टेस 

नेत्यानाहू यांनी 1991 मध्ये त्यांनी तिसरे लग्न केले. नेत्यानाहू यांचे तिसरे लग्न देखील चर्चेचा विषय बनले होते. त्यांच्या तिसऱ्या पत्नीचे नाव सारा होते. ती इस्रायल एअरलाइन्सची एअर होस्टेस होती. दोघे पहिल्यांदा कधी आणि कसे भेटले या संदर्भात अनेक गोष्टी इस्रायली मीडियामध्ये समोर आल्या होत्या.

नेत्यानाहू आणि सारा कसे भेटले?

इस्त्रायली वृत्तपत्रांमध्ये सारा आणि नेत्यानाहू कसे भेटले हे अनेकदा सांगण्यात आले आहे. दोघांची पहिली भेट ॲमस्टरडॅमच्या शिफोल विमानतळावर झाली होती. त्यानंतर असे काही घडले की दोघांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. मात्र, नेत्यानाहू यांची पत्नी सारा नेहमी मीडियात चर्चेचा विषय बनली. 

त्यानंतर सेक्स टेप बॉम्ब फुटला 

इस्त्रायली मीडियामध्ये साराची अनेकदा चर्चा होते. अनेक घोटाळे आणि भ्रष्टाचारात तिचे नाव पुढे आले होते. एके दिवशी या प्रेमकथेतही एक वळण आले. एक दिवस साराला एका महिलेचा फोन आला. महिलेने सांगितले की, माझे तुमच्या पतीसोबत संबंध आहेत. आमचा एक सेक्स व्हिडिओ माझ्याकडे उपलब्ध आहे. 

अन् नेत्यानाहू यांनी देशाची माफी मागितली

नेत्यानाहू सेक्स व्हिडीओमुळे पुन्हा अडचणीत आले होते. त्यांच्या कुटुंबात यामुळे मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर या सेक्स टेपवरून त्यांनी पत्रकारांसमोर येऊन देशाची माफी मागितली. नेतन्याहू म्हणाले की, त्यांना यामध्ये गोवण्यात आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Iran vs Israel : नेतान्याहू म्हणजे हिटलर, भारत मदत करू शकतो; इस्त्रायलवरील हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour D Gukesh World Chess Champion : युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा 'राजा'Zero Hour Arvind Sawant : One Nation One Election विधेयकाला ठाकरेंची शिवसेना विरोध करणार?Zero Hour Sharad Pawar Ajit Pawar Meet : शरद पवारांचा वाढदिवस... दादांची भेट; राष्ट्रवादीत मनोमिलन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Embed widget