एक्स्प्लोर

Donald Trump Global Tariff: ट्रम्प यांचा 10 टक्के Global Tariff म्हणजे काय? भारताच्या निर्यातीवर काय परिणाम होऊ शकतो?

Donald Trump Global Tariff: अमेरिका सध्या प्रत्येक देशासोबत युद्धस्थितीत नसताना त्या कायद्याचा आधार घेऊन व्यापक टॅरिफ लावणे योग्य नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले.

Donald Trump Global Tariff: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांना मोठा धक्का देत ‘इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स अॅक्ट’ (IEEPA) अंतर्गत लावलेले जागतिक टॅरिफ अवैध ठरवले आहेत. 6-3 अशा बहुमताने दिलेल्या निर्णयात न्यायालयाने स्पष्ट केलं की, आयात शुल्क लावण्याचा अधिकार केवळ काँग्रेसकडे आहे; राष्ट्राध्यक्षांना तो एकतर्फी वापरता येणार नाही.

मात्र, या निर्णयानंतर अवघ्या तीन तासांत ट्रम्प प्रशासनाने Trade Act 1974 मधील Section 122 चा आधार घेत 10 टक्के जागतिक आयात टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली. या संदर्भातील अध्यादेशावर स्वाक्षरी करून 24 फेब्रुवारीपासून नव्या शुल्काची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे. हे शुल्क पुढील 150 दिवसांसाठी लागू राहू शकते.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?

न्यायालयाने स्पष्ट केलं की IEEPA हा कायदा युद्ध किंवा राष्ट्रीय आणीबाणीच्या परिस्थितीत वापरण्यासाठी आहे. अमेरिका सध्या प्रत्येक देशासोबत युद्धस्थितीत नसताना त्या कायद्याचा आधार घेऊन व्यापक टॅरिफ लावणे योग्य नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले.

या टॅरिफविरोधात अमेरिकेतील 12 राज्यांनी तसेच लहान व्यापाऱ्यांनी याचिका दाखल केली होती.

मग ट्रम्प यांनी कोणता पर्याय निवडला?

न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर प्रशासनाने 1974 च्या Trade Act मधील Section 122 चा वापर केला. यामधये राष्ट्राध्यक्षांना व्यापार तुटीच्या किंवा आर्थिक असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरते टॅरिफ लावण्याचा अधिकार देतो.

इतिहासात 1971 मध्ये राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी अशाच प्रकारचा उपाय वापरला होता. त्यानंतर हा अधिकार क्वचितच वापरण्यात आला आहे.

आधीचे टॅरिफ काय झाले?

न्यायालयाच्या निर्णयामुळे ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ (काही देशांवर 25 ते 34 टक्क्यांपर्यंत) अवैध ठरले. मात्र, स्टील आणि अॅल्युमिनियमवरील शुल्क वेगळ्या कायद्यांतर्गत असल्याने ते कायम राहतील.

टॅरिफद्वारे गोळा केलेल्या अंदाजे 200 अब्ज डॉलर्सची रक्कम परत केली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भारतावर काय परिणाम होऊ शकतो?

अमेरिका हा भारताचा महत्त्वाचा व्यापार भागीदार आहे. यापूर्वी भारतावर लादण्यात आलेल्या 50 टक्के दंडात्मक टॅरिफनंतर वाटाघाटी होऊन 18 टक्क्यांपर्यंत दर निश्चित झाला होता. न्यायालयीन निर्णयामुळे तो दर अवैध ठरला असला तरी नव्या 10 टक्के जागतिक टॅरिफमुळे भारतालाही त्याचा फटका बसू शकतो.

भारतावर संभाव्य परिणाम काय होऊ शकतो?

  • भारतीय निर्यातदारांसाठी स्पर्धात्मक दबाव वाढू शकतो
  • IT, औषधनिर्मिती आणि अभियांत्रिकी क्षेत्रावर अप्रत्यक्ष परिणाम
  • अमेरिका-भारत व्यापार चर्चांमध्ये नव्या अटींची शक्यता
  • ट्रम्प यांनी भारताशी व्यापार करारात मूलभूत बदल होणार नसल्याचे संकेत दिले आहेत; मात्र जागतिक व्यापारातील अस्थिरतेमुळे बाजारात अनिश्चितता कायम आहे.

12  राज्यांनी ट्रम्पविरुद्ध खटला दाखल  

ट्रम्प यांनी गेल्या एप्रिलमध्ये हे शुल्क जाहीर केले. असंख्य लहान व्यवसाय आणि 12 राज्यांनी या शुल्कांविरुद्ध खटला दाखल केला, ज्यात राष्ट्रपतींनी त्यांच्या सीमेबाहेरून आयात केलेल्या वस्तूंवर नवीन शुल्क लादल्याचा आरोप केला. 

अ‍ॅरिझोना, कोलोरॅडो, कनेक्टिकट, डेलावेअर, इलिनॉय, मेन, मिनेसोटा, नेवाडा, न्यू मेक्सिको, न्यू यॉर्क, ओरेगॉन आणि व्हरमाँट या राज्यांनी लहान व्यवसायांसह ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला दाखल केला.

कनिष्ठ न्यायालयांकडूनही टॅरिफ बेकायदेशीर घोषित 

यापूर्वी, कनिष्ठ न्यायालयांनी (आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालय आणि फेडरल सर्किट कोर्ट) या शुल्कांना बेकायदेशीर घोषित केले होते. त्यांचा असा विश्वास होता की IEEPA ने शुल्क लादण्याचा इतका व्यापक अधिकार दिलेला नाही.

सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2025 मध्ये तोंडी युक्तिवाद ऐकले, जिथे न्यायाधीशांनी ट्रम्प यांच्या युक्तिवादांवर शंका व्यक्त केली. न्यायालयाच्या 6-3  बहुमत असूनही, न्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित केला की राष्ट्रपती काँग्रेसच्या मान्यतेशिवाय इतके मोठे शुल्क लादू शकतात का, कारण शुल्क हा कराचा एक प्रकार आहे आणि काँग्रेसची जबाबदारी आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?
Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?
Donald Trump On Iran Israel America War: ट्रम्पची धमकी वाया, होर्मुजवर कुणाचीही साथ नाही, तावातावाने म्हणाले, मला कुणाची गरज नाही!
ट्रम्पची धमकी वाया, होर्मुजवर कुणाचीही साथ नाही, तावातावाने म्हणाले, मला कुणाची गरज नाही!
Pakistan Airstrike In Afghanistan Kabul: दहशतवादी स्थळ सांगून पाकिस्तानकडून रुग्णालयावर एअरस्ट्राईक; 400 जणांनी गमावला जीव, अफगाणिस्तान हादरलं
दहशतवादी स्थळ सांगून पाकिस्तानकडून रुग्णालयावर एअरस्ट्राईक; 400 जणांनी गमावला जीव, अफगाणिस्तान हादरलं
Edible Oil Price Hike: युद्धामुळं उडाला महागाईचा भडका! LPG नंतर आता तेलाच्या किंमतीही कडाडल्या, 1 लीटरची किंमत किती?
युद्धामुळं उडाला महागाईचा भडका! LPG नंतर आता तेलाच्या किंमतीही कडाडल्या, 1 लीटरची किंमत किती?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
Gold Silver Price Today: युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
LPG गॅस तुटवड्याची झळ थेट बॉलिवूडपर्यंत; खिलाडी कुमार अन् ट्विंकलची धडधड वाढली, शोधला 'हा' पर्यायी मार्ग, अक्षय म्हणाला...
LPG गॅस तुटवड्याची झळ पोहोचली बॉलिवूडपर्यंत! अक्षय कुमार अन् ट्विंकलने शोधला 'हा' पर्यायी मार्ग, अक्षय थेटच म्हणाला...
Embed widget