(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Afghanistan Blast : काबुल येथील मशिदीत बॉम्बस्फोट; 10 जणांचा मृत्यू
Afghanistan Blast : अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरलं आहे. काबुल येथील एका मशिदीत शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
Kabul Mosque Blast : अफगाणिस्तान पुन्हा एकदा स्फोटाने हादरलं आहे. काबुल येथील एका मशिदीत शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. तालिबानच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, काबुलमधील सुन्नी मशिदीत स्फोट झाला. मशिदीत झालेल्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला होता. या स्फोटात 20 जण जखमी झाले असून अनेकांची स्थिती गंभीर आहे.
स्फोटानंतर मीडियाने स्थानिक लोकांशी बातचीत केल्यानंतर ते म्हणाले, पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी नमाजासाठी अनेक नागरिक जमले होते. शुक्रवारी मशिदीत अनेकजण होते. काही लोक नमाज पठण करत होते. या बॉम्बस्फोटामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे
शुक्रवारीअचानक मशिदीत बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी मशिदीत काही लोक नमाज पठण करत होते. अचानक बॉम्बस्फोट झाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालं. अनेक लोक सैरावैरा पळू लागले. त्यामुळे अनेकजण जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातेय.तालिबानच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद नफी ताकोर यांनी माहिती दिली नाही. तालिबानच्या सुरक्षारक्षांनी संपूर्ण परिसरात नाकेबंदी केली आहे. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं घेतली नाही. ही मशीद सुन्नी समाजाची आहे.
गुरूवारी काबुलमध्ये दोन स्फोट झाले. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला आणि मृतांची संख्या 10 वर गेली आहे. गतवर्षी तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला होता. तेव्हापासून अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकजणांना जीव गमावावा लागला.
संबंधित बातम्या :
- Afghanistan Blast : दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं अफगाणिस्तान, 13 जण जखमी तर 9 लोकांचा मृत्यू
- Nandan Nilekani : अमेरिकन कंपन्यांविरोधात सरकारची मोहीम, अॅमेझॉन आणि वॉलमार्टपासून भारतीय दुकानदारांना वाचवणार नंदन निलेकणी
- Coca-Cola : कोका-कोलामध्ये खरंच कोकेन होतं? औषध ते शीतपेय असा प्रवास करणाऱ्या कंपनीचा रंजक इतिहास