एक्स्प्लोर

अविनाश भोसले यांचा रिक्षाचालक ते तीन हेलिकॉप्टर खरेदीपर्यंतचा थक्क करणारा प्रवास!

पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरू केला. पुढे ते रिक्षा भाड्यानं चालवण्यासाठी देऊ लागले. त्यानंतर स्वतःच्या मालकीची तीन हेलिकॉप्टर खरेदी करण्यापर्यंत त्यांचा प्रवास झालाय.

पुणे : अविनाश भोसले हे नाव महाराष्ट्रात नेहमीच वादग्रस्त ठरलंय. कधी जलसंपदा विभागातील कोट्यावधी रुपयांच्या कंत्राटांसाठी, तर कधी सर्वपक्षीय राजकारण्यांशी असलेल्या घनिष्ठ संबंधांसाठी. शुक्रवारी अविनाश भोसलेंची ईडीकडून 2007 सालच्या एका प्रकरणात तब्बल आठ तास चौकशी करण्यात आल्यान ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत. रिक्षाचालक म्हणून सुरू झालेला अविनाश भोसले यांचा प्रवास स्वतःच्या मालकीची तीन हेलिकॉप्टर खरेदी करण्यापर्यंत झालाय.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले तेव्हा रिक्षा चालवण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरू केला. पुढे ते रिक्षा भाड्यानं चालवण्यासाठी देऊ लागले. पुढे अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी झाली आणि अविनाश भोसले रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेऊ लागले. पुढे सासर्‍यांच्या माध्यमातून त्यांना अधिक मोठी काम मिळायला लागली.

पण अविनाश भोसले यांचं नशीब खऱ्या अर्थाने उघडलं ते 1995 ला राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग ओलिताखाली आणण्यासाठी युती सरकारकडून कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आणि या महामंडळाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच्या कामांना सुरुवात झाली. तोपर्यंत जलसंपदा विभागातील काम करण्यासाठी आंध्र प्रदेशातील कंत्राटदारांना पसंती दिली जायची. मात्र अविनाश भोसले यांच्या या विभागातील प्रवेशाच्या माध्यमातून एक मराठी कंत्राटदार पुढे आणला गेला. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांची जवळीक साधण्याचं आणि पुढे ती वाढवण्याचं कौशल्य अविनाश भोसले यांच्या कामी आलं आणि त्यांची आर्थिक भरभराट सुपरसोनिक वेगाने सुरू झाली.

1999 ला युती सरकार जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार राज्यात सत्तारूढ झालं. अविनाश भोसले यांनी नव्या सत्ताधाऱ्यांशी देखील तेवढच जुळवून घेतलं आणि त्यांची आर्थिक घोडदौड तशीच पुढे सुरूच राहिली. एकीकडे महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प कोट्यावधी रुपयांचा खर्च केल्यानंतर देखील वर्षानुवर्ष रखडत होते तर दुसरीकडे अविनाश भोसले यांची संपत्ती डोळे विस्फारणाऱ्या वेगाने वाढत होती. पुण्यातील बाणेर भागात अविनाश भोसले मी उभारलेलं व्हाईट हाऊस हे थोड्याच कालावधीत चर्चेचा विषय बनलं. या व्हाईट हाऊसच्या समोर अविनाश भोसलेंच्या मालकीच तीन हेलिकॉप्टर उभी राहिली. अवघ्या काही रिक्षा व्यवसाय ते स्वतःच्या मालकीची हेलिकॉप्टर इथपर्यंतचा अवघ्या काही वर्षांचा मध्ये झालेला अविनाश भोसले यांचा प्रवास अचंबित करणारा होता.

अविनाश भोसले यांच्या या सुपरसोनिक वेगाने सुरू असलेल्या प्रवासाला ब्रेक लागला तो 2007 चाली जेव्हा मुंबई एअरपोर्टवरती त्यांना कस्टम विभागाकडून अटक करण्यात आली. लंडनहून येताना आणलेल्या महागड्या वस्तू आणि परदेशी चलन अविनाश भोसलेंनी कस्टम ड्युटी चुकवुन एअरपोर्टच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांचावर आरोप होता. मात्र पुढे या या प्रकरणात फारशी चौकशी झाली नाही आणि सर्वपक्षी आणि त्यांची असलेल्या संबंधांमुळे अविनाश भोसले यांचा प्रवास पुढे सुरू राहिला.

त्यानंतर जलसंपदा विभागातील ठेकेदारी कमी करून बांधकाम क्षेत्र, रस्ते आणि पूल उभारणी, हॉटेल व्यवसाय याकडे मोर्चा वळवला. पुण्यातील कोरेगाव पार्क भागात त्यांनी उभारलेल्या हॉटेलच्या उद्घाटनाला त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख , शरद पवार ,गोपीनाथ मुंडे, पतंगराव कदम आणि त्यावेळेचे देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहिले. अविनाश भोसले यांच्या या प्रवासात राजकीय नेत्यांची त्यांची असलेली जवळीक ही अनेकदा दिसून आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा पुण्यात यायचे तेव्हा अविनाश भोसले स्वतःची गाडी घेऊन बाळासाहेब ठाकरे यांचे सारथ्य करायचे. शिवाय बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वरला अनेकदा अविनाश भोसले यांच्या बंगल्या मध्ये मुक्कामाला देखील राहिलेत. उद्धव ठाकरे यांनी आषाढी वारीची फोटोग्राफी करताना ज्या हेलिकॉप्टर चा उपयोग केला ते हेलिकॉप्टर देखील अविनाश भोसले यांच्या मालकीचं होतं आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पाहावा विठ्ठल या त्यांच्या पुस्तकामध्ये अविनाश भोसले यांचे आभारही मानलेत.

गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीच्या पुण्यात झालेल्या लग्नावेळी अनेक पाहुणे हे अविनाश भोसले यांच्या पंचतारांकित हॉटेलमध्येच मुक्कामाला होते. अजित पवार पुण्यात रेंज हिल भागातील ज्या जिजाई बंगल्यामध्ये राहतात तो बंगला अविनाश भोसले यांच्या भावजयीच्या मालकीचा आहे. अविनाश भोसले यांच्या मुलीचा विवाह काँग्रेस नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री विश्वजीत कदम यांच्याशी झालाय. जलसंपदा विभागातील वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकल्पांबाबत आणि त्यावरती करण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चाबाबत जेव्हा वादंग निर्माण झाला तेव्हा अविनाश भोसले यांनी जलसंपदा विभागातील कामं कमी करून इतर क्षेत्रांमध्ये उडी घेतली. आज पुण्यातील सर्वात उंच इमारती या त्यांच्या एबीआयएल या कंपनीने बांधल्यात. आज अविनाश भोसले यांच्या कंपनीची उलाढाल काही हजार कोटींमध्ये आहे.

2017 सली इन्कमटॅक्स विभागाने अविनाश भोसले यांच्या घरी छापा टाकल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले होते. यावेळी ईडीने अविनाश भोसले यांना 2007 साली त्यांच्यावरती कस्टम विभागाकडून ज्या फेमा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती त्या प्रकरणासंबंधी माहिती घेण्यासाठी चौकशीला बोलावल्याचा सांगण्यात आलंय. मात्र 2007 सालच्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावून अविनाश भोसलेंच्या माध्यमातून राज्य सरकारमधील बड्या नेत्यांवर दबाव टाकण्याचा तर हा प्रयत्न नाही ना असा प्रश्न विचारला जातोय. खासकरुन राज्य सरकारमधील एका बड्या अधिकार्यासोबत अविनाश भोसलेंच्या संबंधांची चर्चा आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Embed widget