बिलेटेड आयटीआर म्हणजे काय? 1000 आणि 5000 रुपये शुक्ल कधी, का द्यावे लागते? वाचा सविस्तर
आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. या तारखेनंतर आयटीआर भरायचा असल्यास तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागेल. मुदत संपल्यानंतर तुम्हाला बिलेडेट आडटीआर भरता येईल.
What is Belated ITR: आर्थिक वर्ष 2023-24 आणि असेसमेंट ईअर 2024-25 साठी इन्कम टॅक्स रिटर्न्स (Income Tax Return) दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. याच कारणामुळे सध्या अनेक करदाते आयटीआर दाखल करण्यासाठी घाई करत आहेत. अनेकजण आयटीआर दाखल करण्यासाठी सीए, आर्थिक सल्लागारांची मदत घेत आहेत. दरम्यान, आयटीआर दाखल करण्याची शेवटची मुदत 31 जुलै आहे. या तारखेनंतर तुम्हाला आयटीआर दाखल करायचा असेल तर विलंब शुक्ल भरावे लागेल. 31 जुलैपर्यंत आयटीआर दाखल न करून शकणाऱ्यांना पुन्हा एखदा Belated ITR दाखल करण्याची संधी दिली जाईल. पण त्यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे विलंब शुल्क भरावे लागेल. याच पार्श्वभूमीवर Belated ITR कोण आणि कधी भरू शकतो? हे जाणून घेऊ या..
Belated ITR काय असतो?
आयटीआर भरण्याची शेवटची मुदत जवळ आल्यामुळे आता Belated ITR चा उल्लेख वारंवार केला जातोय. हा Belated ITR म्हणजे नेमकं काय? असं विचारलं जातंय. एखादा करदाता शेवटच्या मुदतीपर्यंत आयटीआर दाखल न करून शकल्यास त्याला Belated ITR च्या माध्यमातू आयटीआर भरण्याची संधी दिली जाते. म्हणजेच मुदत संपल्यानंतर एखादा करदाता आयटीआर दाखल करत असेल तर त्याला Belated ITR म्हटले जाते.
Belated ITR भरल्यास भरावा लागणार दंड
Belated ITR आईटीआरच्या माध्यमातून करदात्यांना मुदत संपल्यानंतर आयटीआर भरण्यासी संधी मिळत असली तरी त्यामुळे करदात्यांचे नुकसान होऊ शकते. या बिलेटेड आयटीआरचा सर्वात पहिला फटका म्हणजे तुम्हाल विलंब शुक्ल द्यावे लागते. तुमचे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेत्रा कमी असेल तर हे विलंब शुल्क 1000 रुपये असेल. तुमचे उत्पन्न करपात्र नसेल आणि तुम्ही बिलेडेट आयटीआर भरत असाल तरीदेखील तुम्हाला विलंब शुक्ल द्यावे लागेल. तुम्ही शून्य कर देत असले तरीदेखील तुम्हाला बीलेटेड आयटीआर भरताना लेट फी द्यावीच लागेल. तुमचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला बिलेटेड आयटीआर भरताना 5000 रुपयांचे विलंब शुल्क द्यावे लागेल.
बिलेटेड आयटीआर कोण भरू शकतो?
बिलेटेड आयटीआर या नावातच कोण आयटीआर भरू शकतो, हे समजून येते. शेवटच्या मुदतीपर्यंत आयटीआर भरू न शकणारे सर्वजण बिलेटेड आयटीआर दाखल करू शकतात. शेवटची मुदत संपल्यानंतर तुम्ही बिलेटेड आयटीआर दाकल करू शकता.
दरम्यान, आयटीआर दाखल करताना प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शेवटच्या मुदतीत वाढ करावी, अशी मागमी केली जात होती. प्राप्तिकर विभागाने मात्र ही मागणी फेटाळली आहे. त्यामुळे करदात्यांना 31 जुलैच्या आतच प्राप्तिकर भरावा लागेल.
हेही वाचा :
15-15-15 चा फॉर्म्यूला तुम्हाला 15 वर्षांत करणार करोडपती, जाणून घ्या नेमकं कसं?
पैसे ठेवा तयार! या आठवड्यात येणार तब्बल 7 नवे आयपीओ; पैसे कमवण्याची नामी संधी