पैसे ठेवा तयार! या आठवड्यात येणार तब्बल 7 नवे आयपीओ; पैसे कमवण्याची नामी संधी
गेल्या काही दिवसातं अनेक कंपन्यांनी आपले आयपीओ आणले आहेत. या आठवड्यात एकूण सात आयपीओ येणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे कमवण्याची चांगली संधी आली आहे.
![पैसे ठेवा तयार! या आठवड्यात येणार तब्बल 7 नवे आयपीओ; पैसे कमवण्याची नामी संधी new ipo launch list 2024 for this week seven new ipo will launch know detail information in marathi पैसे ठेवा तयार! या आठवड्यात येणार तब्बल 7 नवे आयपीओ; पैसे कमवण्याची नामी संधी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/28/384980e3e4d3ae1c39e41fac2ee4664c1722137738514988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : तुम्ही शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी खास ठरणार आहेत. कारण या आठवड्यात एक-दोन नव्हे तर तब्बल आठ आयपीओ येणार आहेत. या आयपीओंत गुंतवणूक करून चांगले पैसे कमवण्याची नामी संधी चालून आली आहे. या आठपैकी 7 आईपीओ एसएमई तर एक आयपीओ हा मेनबोर्ड सेगमेंटचा आहे. यासह या आठवड्यात एकूण 11 कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारात पैसा टाकला जातोय. गुंतणूक वाढल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे मूल्य वाढले आहे. सध्या भारतीय शेअर बाजार हा जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा भांडवली बाजार आहे.
अक्यूम्स ड्रग्स अँड फार्मा आईपीओ
ही कंपनी मूळची दिल्लीची आहे. या कंपनीच्या आयपीची साईझ 1,857 कोटी रुपये आहे. 30 जुलै रोजी या आयपीओत तुम्हाला गुंतवणूक करता येईल. 1 ऑगस्टपर्यंत तुम्हाला ही गुंतवणूक करता येईल. या आयपीओत 680 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स आहेत. या आयपीओचा किंमत पट्टा (प्राईस बँड) 646-679 रुपये आहे.
7 एसएमई आयपीओ
एकूण पाच 5 एसएमय आईपीओ हे 30 जुलै रोजी खुले होणार असून 1 ऑगस्ट रोजी बंद होतील. यामध्ये बल्ककॉर्प इंटरनॅशनल, सथलोखर सिनर्जिस, किजी अपॅरल्स, आशापुरा लॉजिस्टिक्स, राजपुताना इंडस्ट्रीज या आयपीओंचा ससमावेश आहे.
पहिल्या सहा महिन्यांत 34 आयपीओ
2024 साली शेअर बाजारात मोठी उलाढाल आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक कंपन्या आपले आयपीओ घेऊन आल्या आहेत. चालू वर्षात 1 जुलै 2024 पर्यंत तब्बल 34 मेनबोर्ड आयपीओ आलेले आहेत. या 34 कंपन्यांनी या वर्षी आयपीओच्या माध्यमातून तब्बल 31,000 कोटी रुपये उभे केले आहेत. विशेष म्हणजे या वर्षी शेअर बाजारावर सूचिबद्ध झालेल्या कंपन्यांपैकी 75 टक्के कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. 2023 साली वर्षभरात एकूण 58 कंपन्यांनी आपले आयपीओ आणले होते. चालू वर्षात फक्त सहा महिन्यांतच आयपीओंचा आकडा 34 वर पोहोचला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
मोठी बातमी! तब्बल 6000 कोटी रुपयांचा आयपीओ येणार, मालामाल होण्याची 'ही' संधी सोडू नका!
खुशखबर! आयफोन झाले स्वस्त, जाणून घ्या प्रो, मॅक्स मॉडेल्सची नवी किंमत काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)