एक्स्प्लोर

Pooja Khedkar: बहुचर्चित पूजा खेडकरांनी वाशिममध्ये पदभार स्वीकारला, प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या....

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर या पुण्यातील प्रोबेशनरी आयएएस अधिकारी होत्या. त्यांची वाशिमला बदली करण्यात आली होती. त्यांनी आज पदभार स्वीकारला. पूजा खेडकर या महाराष्ट्र केडरच्या 2022 च्या बॅचमधील IAS अधिकारी आहेत.

वाशिम: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात असताना सरंजामी थाटात वावरण्यामुळे चर्चेत असलेल्या पोब्रेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम (Washim) येथे बदली करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे उत्पन्न, श्रीमंत थाट ते त्या सनदी अधिकारी होण्यास कशाप्रकारे पात्र नव्हत्या, याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पहिल्यांदाचा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

पूजा खेडकर यांना त्यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चा आणि आरोपांबद्दल विचारण्यात आले. त्यावर पूजा खेडकर यांनी म्हटले की, मला सध्या काहीही बोलण्याची परवानगी नाही. मला वाशिममध्ये रुजू होताना आनंद होतोय, इथून पुढेही मला वाशिममध्ये काम करायला आवडेल. मला सरकारने काहीही बोलण्यासाठी परवानगी दिलेली नाही. यावेळी पूजा खेडकर यांना त्यांच्या उत्पन्नावरुन, नॉन-क्रीमिलेअर सर्टिफिकेटवरुन सुरु असलेल्या वादाबाबत विचारण्यात आले. त्यावर पूजा खेडकर यांनी, 'मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही, या प्रकरणात मला सरकारने काही बोलायला परवानगी दिलेली नाही. मी आज वाशिमममध्ये रुजू झाली आहे', असे खेडकर यांनी म्हटले. यानंतर पूजा खेडकर तिथून निघून गेल्या.

पूजा खेडकर या महाराष्ट्र केडरच्या 2022 च्या बॅचमधील IAS अधिकारी आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुण्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, या काळातील पूजा खेडकर यांचा रुबाब जिल्हाधिकाऱ्यांनाही लाजवणार होता. प्रोबेशनरी अधिकाऱ्यासाठी स्वतंत्र केबिन किंवा गाडीची सुविधा नसते. मात्र, पूजा खेडकर या स्वत:च्या खासगी ऑडी गाडीवर लाल-निळा दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी नेमप्लेट लावून फिरायच्या. याशिवाय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावून पूजा खेडकर यांनी तिकडे स्वत:चे कार्यालय थाटले होते. या कार्यालयातील फर्निचरही पूजा खेडकर यांनी बदलले होते. या सगळ्या सरंजामी थाटामुळे पूजा खेडकर या सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अखेर  पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून त्यांच्या बदलीची शिफारस केल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला होता.

पूजा खेडकर शिकाऊ उमेदवार म्हणून चार्ज स्वीकारणार

एक ना अनेक कारणावरून चर्चेत असलेल्या IAS प्रोबेशनल अधिकारी पूजा खेडकर यांची पुण्यावरून थेट वाशिम येथे बदली करण्यात आली.. 8 जुलै रोजी बदलीच्या आदेशानुसार खेडकर   शासनाकडून रुजू करण्याचे आदेश काढण्यात आले होते . नऊ तारखेला त्या संदर्भात तसे पत्र वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मिळालं  होतं. काल दुपारीला हे पत्र वाशिम जिल्हा अधिकारी प्राप्त झालं होते.  आज पूजा खेडकर ह्या प्रोबेशनल अधिकारी म्हणून वाशिम जिल्हाअधिकारी कार्यालयात वाशिम जिल्हा अधिकारी बूवनेश्वरी एस यांची त्यांनी भेट घेऊन आज अधिकृतपणे त्यांनी आपला शिकाऊ उमेदवाराचा पदभार सांभाळला. आज जिल्ह्यातील सर्वच अधिकाऱ्यांशी भेटी घेऊन उद्या पूजा खेडकर सार्वजनिक बांधकाम विभागात शिकाऊ उमेदवार म्हणून चार्ज स्वीकारणार आहेत. 

VIDEO: पूजा खेडकर नेमकं काय बोलल्या?

बेटीपेक्षा बापच सवाई! वादग्रस्त प्रशासकीय कारकीर्द, निलंबनाची कारवाई, 40 कोटींची आर्थिक माया; कोण आहेत IAS पूजा खेडकरांचे वडील

आणखी वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget