Maharashtra Live Updates:राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये 2,99,051 इतकी पदे रिक्त; विधानसभेत तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांच लेखी उत्तर
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog updates: जतमधील स्ट्राँगरूम बाहेरील स्क्रीन बंद असल्याने काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय नाना शिंदे यांनी या स्ट्रॉंग बाहेर जाऊन स्क्रीन का बंद आहे याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला. स्ट्रॉंग रूम बाहेरील स्क्रीन का बंद आहे याबाबत निवडणुका अधिकाऱ्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे सुजय नान शिंदे यांनी स्ट्राँगरूमबाहेरच उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
"दो भाई, दोनो तबाही", गुन्हेगारी प्रवृत्त रिल्स तयार करणाऱ्यांवर पुणे पोलिसांची "मुंडन" कारवाई
सोशल मीडियावर गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या किंवा चक्क शिवीगाळ करून दहशत पसरवणाऱ्या रिल्स अपलोड करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. पुण्यातील खडकी भागात २ तरुणांनी येरवडा जेल, दो भाई, दोनो तबाही, जिंदगी खराब करून टाकेल अशा प्रकारच्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. या व्हिडिओ मधून गुन्हेगारी प्रवृत्त करणारे वाक्य असल्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओ बद्दल माहिती मिळताच खडकी पोलिसांना या तरुणांचा शोध घेण्याचं ठरवलं आणि अखेर ते दोघे सापडले. खडकी पोलिसांनी या दोन तरुणांना ताब्यात घेतलं त्यांचं मुंडन करून त्यांना थेट कॅमेरा समोर माफी मागायला लावली. पुणे पोलिसांकडून सध्या अशा पद्धतीचे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे.
म्हशीच्या गोठ्यामध्ये सुरू असलेले ड्रग्स तयार करण्याचा कारखाना उध्वस्त; सावरी येथील एमडी ड्रग्स प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांची कारवाई
सातारा: साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरी येथील एमडी ड्रग्स प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांची कारवाई करून म्हशीच्या गोठ्यामध्ये सुरू असलेले ड्रग्स तयार करण्याचा कारखाना उध्वस्त केला.. या अत्यंत दुर्गम भागामध्ये कोणाच्या आदेशावरून ड्रग्स कारखाना सुरू होती.. सावरी गावातून जे 3 परप्रांतीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेतले ते कारागीर नेमके कोणाचे आहेत याचा तपास पोलीस घेत आहेत...मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांनी जप्त केलेल्या कारवाईत सुमारे 7 किलो 718 ग्राम एमडी ड्रग्स आणि 38 किलो लिक्विड असा सुमारे कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. परप्रांतीयांसह आणखी किती आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले, त्याचबरोबर किती किलो ड्रग्स ताब्यात घेतला..यामध्ये किती लोकांचा समावेश आहे. याची माहिती मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांनी माध्यमांना दिली नाही त्यामुळे अनेक तर्कवितर्क नागरिकांमध्ये लावण्यात येत आहेत.. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रकाश शिंदे यांच्यावर आरोप केला ते प्रकाश शिंदे नेमके कोण त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का.. ओंकार डिगे याला अटक करण्यात आले आहे का? या कारवाई मधून कोणाला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत का असावा देखील उपस्थित होत आहे.























