Wardha : तळेगावच्या सत्याग्रही घाटाच्या परीसरात मध्यरात्री खूनाचा थरार, ट्रकही पळवला
Wardha Crime News : पोलीसांनी अवघ्या काही तासात नागरपुरातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या
Wardha Crime News : वर्धा येथील तळेगांव (शा.पंत) येथं शुक्रवारच्या मध्यरात्री नागरिक गाढ झोपेत असताना येथील प्रसिद्ध सत्याग्रही घाटाच्या परीसरात खूनाचा थरार घडलाय. धक्कादायक म्हणजे मारेकरी खून करूनच थांबले नाही तर ज्या ट्रक चालकाचा खून केला तो ट्रकच चोरून नेल्याची दुर्दैवी आणी तितकीच भयानक घटना घडली आहे. या घटनेने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. चक्रधरसिंह रामसजीवनसिंह असं मृत चालकाचं नाव आहे. आरोपी सुनिल गामा भारव्दाज रा. वलनी खदान सावनेर जि. नागपूर ह्याला पोलिसांनी अटक केली. तर विकास उर्फ ईसरार शेख रा.ह.मु. कारंजा (घा) जि. वर्धा याच्या शोधात पोलीस आहेत..
नागपूरकडून अकोल्याला जात होता ट्रक:
नागपूर येथील जसविंदरसिंग हरिसिंग सैनी व जसविरसिंग सासन हे दोघे मित्र मिळून सासन ट्रान्सपोर्ट चालवतात. त्यांच्या ट्रक मध्ये त्यांचा अत्यंत जुना व विश्वासू चालक जो त्यांच्याकडे गेल्या 25 वर्षांपासून कामावर होता ,तो हा ट्रक घेऊन नागपूर येथून अकोला साठी निघाला होता. त्या ट्रकमध्ये लोखंडी पाईपचा माल भरून होता. शनिवारी सकाळी पारशिवणी पोलिसांचा फोन जसविर सिंग यांना आला व तुमचा ट्रक पारशिवानी पोलीस ठाण्यात उभा आहे, असे सांगितले. यावरून त्यांनी लगेचच चालक चक्रधारसिंग याला फोन लावला मात्र त्याचा फोन बंद येत होता.
चालकाची हत्या करून ट्रक पळविला :
लोखंडी पाईपचा माल भरण्याकरता ट्रकचा ड्रायव्हर मृतक चक्रधरसिंग रामसजिवनसिंग हा एकटाच निघाला होता आणि त्या कंपनिमध्ये ई बिल जनरेट व्हायला वेळ लागल्याने रात्री अंदाजे 9 वाजताच्या दरम्यान मालकाने ड्रायव्हर चक्रधरसिंगला फोन केला. त्याने सांगितले की ट्रक भरलेला आहे, आणि थोडया वेळात अकोल्या साठी निघतो. रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान ट्रकमध्ये माल भरून अकोल्याकडे जाण्यास निघाला असता
सुनिल गामा भारव्दाज आणि विकास उर्फ ईसरार शेख या दोघांनी चक्रधरसिंगच्या डोक्यावर प्रहार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली आणि लोखंडी पाईप भरून असलेला ट्रक घेऊन पसार झाले. आणि मृतदेह रस्त्यावर पडून राहिला.
ट्रक मालकाला पारशिवनी पोलीस ठाण्यातून फोन आला आणि लोखंडी पाय भरून असलेल्या ट्रक उभा असल्याचे सांगितलं ट्रक मालक हे पारशिवनी ठाण्यात गेले असता आरोपी सुनील आणि विकास यांनी ट्रक चोरून आणत सदर माल पारशिवनी परिसरात विक्री करताना पोलिसांची चाहूल लागल्याने तो पळून गेल्याची माहिती दिली.. काही वेळात पारशिवनी पोलिसांना तळेगाव पोलिसांचा फोन आला. इंद्रमारी परीसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली, त्यांनी पाठवलेल्या फोटोतून मृतदेह चक्रधरसिंग याचा असल्याचं समजलं. हत्येचा गुन्हा दाखल करून तळेगांव पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण मांडून बसले होते.