एक्स्प्लोर

Ram Mandir : राम मंदिराच्या नावाने भक्तांची ऑनलाईन फसवणूक, QR पाठवून पैसे उकळले; 'विहिंप'कडून तक्रार दाखल

Ram Mandir : राम मंदिराचा उद्घाटन सोहळा काही दिवसांवर आलेला असतानाच धक्कादायक प्रकार समोर आलाय. राम मंदिराच्या नावाने भक्तांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्म्सवर  QR कोड शेअर करुन राम मंदिराच्या नावाने पैसे उकळले जात आहेत.

Ram Mandir : राम मंदिराचा उद्घाटन सोहळा काही दिवसांवर आलेला असतानाच धक्कादायक प्रकार समोर आलाय. राम मंदिराच्या नावाने भक्तांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्म्सवर  QR कोड शेअर करुन राम मंदिराच्या नावाने पैसे उकळले जात आहेत. या QR बरोबरच राम मंदिराच्या (Ram Mandir)  उद्घाटन सोहळ्यासाठी तुम्हीही योगदान द्या, असा संदेश दिला जातोय. विश्व हिंदू परिषदेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय, अशा लोकांना कोणताही प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेकडून (Vishva Hindu Parishad) करण्यात आलंय 

फेसबुकवर (Facebook) "श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट" (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra) या नावाने एक प्रोफाईल बनवण्यात आलीये. यावरुन एक QR कोड शेअर करण्यात आलाय. ही प्रोफाईल अभिषेक कुमार या नावाने आहे. या अकाऊंटवरुन राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राम भक्तांनी योगदान द्यावे, असा संदेश देण्यात आलाय. याशिवाय युपीआय नंबरही व्हायरल करण्यात आला आहे. त्यावरुनही भक्तांची फसवणूक करण्यात येत आहे.  उत्तर प्रदेश पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत विश्व हिंदू परिषदेने म्हटले की, "राम भक्तांची ही फसवणूक म्हणजे राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. या अवैध मार्गाने लोकांकडून पैसा उकळला जातोय. पोलिसांनी भक्तांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत."

राम मंदिरासाठी पैसे मागितले जात नाहीयेत - विहिंप 

विश्व हिंदू परिषदेचे (Vishva Hindu Parishad) प्रवक्ते विनोद बंसल (Vinod Bansal) याबाबत बोलताना म्हणाले, अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यासाठी कोणत्याही प्रकारचे दान स्वीकारले जात नाही. शिवाय यासाठी कोणतीही समिती बनवण्यात आलेली नाही. राम मंदिराचे लोकार्पण (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra) हा एक सामाजिक कार्यक्रम आहे. संपूर्ण देशाला याचा आनंद आहे. मात्र, लोकांच्या भावनांचा काही लोक गैरफायदा घेत आहेत. लोकांकडून पैसे उकळले जात आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर लोकांची फसवणूक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलं पाहिजे. शिवाय, अशा लोकांना कोणताही प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन मी रामभक्तांना करत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Tehreek-e-Hurriyat Ban : केंद्र सरकारकडून आणखी एका संघटनेवर बंदी; भारतविरोधी कारवाई करत असल्याचा ठपका

महत्त्वाच्या बातम्या

माधुरी हत्तीवर वनतारा येथे उपचार पूर्ण; वर्षभराहून अधिक काळाच्या उपचारांनंतर महाराष्ट्रात मायभूमीत परतणार
माधुरी हत्तीवर वनतारा येथे उपचार पूर्ण; वर्षभराहून अधिक काळाच्या उपचारांनंतर महाराष्ट्रात मायभूमीत परतणार
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Lucky Zodiac Signs : 13 सप्टेंबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
13 सप्टेंबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Chandrashekhar Bawankule on OYO rooms:ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
Seema Haider Video: सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले,
सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले, "मागे...."
Ajay Baraskar: मनोज जरांगे चालबाज अन् बंडलबाज माणूस; एवढी वाईट वेळ आली की मुंबईला जाण्याचा मार्ग बदलला, कारण...; अजय बारसकरांची बोचरी टीका, सगळंच काढलं!
मनोज जरांगे चालबाज अन् बंडलबाज माणूस; एवढी वाईट वेळ आली की मुंबईला जाण्याचा मार्ग बदलला, कारण...; अजय बारसकरांची बोचरी टीका, सगळंच काढलं!
BRICS Summit : ग्लोबल गव्हर्नन्स रिफॉर्म्ससाठी ब्रिक्स देशांनी 10 प्रस्ताव तयार करावेत, ब्रिक्सनं नव्या आणि महत्वाकांक्षी अजेंड्यावर काम करावं : नरेंद्र मोदी
ब्रिक्सनं नव्या आणि महत्वाकांक्षी अजेंड्यावर काम करावं, ब्रिक्सच्या 20 वर्षांच्या प्रवासाचा दाखला देत नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Popular Actress on Suryakumar Yadav chats: 'माझ्याकडे सूर्यकुमार यादवच्या सगळ्या चॅट्सचे पुरावे..' क्रिकेटरमुळे इन्स्टा अकाउंट बंद झाल्याचा प्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, म्हणाली..
'माझ्याकडे सूर्यकुमार यादवच्या सगळ्या चॅट्सचे पुरावे..' क्रिकेटरमुळे इन्स्टा अकाउंट बंद झाल्याचा प्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, म्हणाली..
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंनी मराठा महिला आंदोलकांना मास्टरप्लॅन सांगितला, म्हणाले, 'मुंबईत शिंदे अन् फडणवीसांचं घर गाठा, अमृताताई अन् लताताईंना हळदी-कुंकू लावा...;
मनोज जरांगेंनी मराठा महिला आंदोलकांना मास्टरप्लॅन सांगितला, म्हणाले, 'मुंबईत शिंदे अन् फडणवीसांचं घर गाठा, अमृताताई अन् लताताईंना हळदी-कुंकू लावा...;
Embed widget