Viral News : शेअर बाजारातील गुंतवणुकीतून पैशाचा पाऊस, विद्यार्थ्याने कमावले एकाच महिन्यात 664 कोटी रुपये
शेअर बाजारातील गुंतवणुकीमुळे एकाच महिन्यात तब्बल 664 कोटी रुपयांचा नफा या विद्यार्थ्याने कमावला आहे.
न्यूयॉर्क : शेअर बाजारातील गुंतवणूक कधी कुणाला रंकाचा राव करेल याचा काही नेम नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करुन अनेकांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत तर अनेकांनी कोट्यवधी रुपये गमावलेत. पण अमेरिकेतील एका विद्यार्थ्याने मात्र केवळ एकाच महिन्याच्या कालावधीत शेअर बाजारातून तब्बल 664 कोटी रुपये नफा मिळवल्याची घटना घडली आहे. अॅप्लाईड मॅथेमॅटिक्स अॅन्ड इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने ही कमाई केलीय.
जॅक फ्रिमॅन नावाच्या या 20 वर्षाच्या विद्यार्थ्याने शेअर बाजाजार 215 कोटी रुपये गुंतवले होते. एक महिन्यानंतर त्याने त्याच्याकडील असलेल्या शेअर्सची विक्री केली आणि त्यातून त्याला तब्बल 879 कोटी रुपयांचा फायदा झाला. या व्यवहारातून त्याने 664 कोटी रुपये कमावले आहेत.
जॅक फ्रिमॅन हा यूनिवर्सिटी ऑफ साउथ कैलिफोर्नियामध्ये प्लाईड मॅथेमॅटिक्स अॅन्ड इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेतोय. त्याने एक महिन्यापूर्वी Bed Bath and Beyond या कंपनीचे रुपयाचे 50 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. एका महिन्यानंतर या शेअरची किंमत 2160 रुपये इतकी झाली. मग जॅकने हे सर्व शेअर्स विकले आणि बक्कळ नफा कमावला. जॅकने सांगितलं की त्याने त्याच्या मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून उधारीने पैसे घेतले होते. आता जॅकला आणि त्याच्या कुटुंबियांना किडनॅपिंगची भीती वाटत आहे.
कोट्यवधी रुपये कमावले असले तरी आपल्या आयुष्यात काही विशेष बदल झालेला नाही असं जॅक फ्रिमॅनने म्हटलं आहे. विद्यापीठात आपल्याला फारसं कोणी ओळखतही नाही, त्यामुळे आपण आपलं शिक्षण कायम ठेवणार असल्याचं त्याने सांगितलं. तसेच मिळालेल्या पैशातून काय करायचं याचं कोणतंही नियोजन नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं.
गेल्याच आठवड्यात या बँकेचे सीईओ गुस्तावो अर्नल यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्यावर इनसायडर ट्रेडिंगचा आरोप करण्यात आला होता. Bed Bath and Beyond कंपनीच्या शेअर्समध्ये आता मोठी घसरण झाली असून शेअर 560 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे कंपनीचा मोठा तोटा झाला असून कंपनीला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. परिणामी कंपनीने अनेक स्टोअर्स बंद केले आहेत, तसेच कर्मचाऱ्यांच्या संख्येतही कपात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :