(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Delhi : पूर आला तरी ताजमहालमध्ये पाणी शिरु शकत नाही; काय आहे त्यामागचं कारण?
Tajmahal Yamuna Water Level: यमुनेचं पाणी ताजमहालच्या भिंतीपर्यंत पोहोचलं असल्याची माहिती मिळत आहे. पण पाण्याची पातळी वाढली तरी ते ताजमहालमध्ये शिरू शकत नाही, हे तुम्हाला माहिती आहे का?
New Delhi: नवी दिल्लीसह (New Delhi) देशातील अनेक राज्यांमध्ये यमुनेच्या पाण्याच्या पातळीत (Yamuna River Water Level Rise) लक्षणीय वाढ झाली आहे. संततधार पावसामुळे आग्र्यातही (Agra) यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. यमुनेचं पाणी ताजमहालच्या (Taj Mahal) भिंतीपर्यंत आल्याची बातमी आहे, जे गेल्या काही वर्षांत प्रथमच घडलं आहे. यमुनेचं वाढतं पाणी पाहून ते लवकरच ताजमहालच्या (Taj Mahal) आत जाईल आणि ऐतिहासिक वास्तूची हानी होईल, असं लोकांना वाटत आहे.
पण काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यमुनेच्या पाण्याची पातळी आणखी वाढली तरी ताजमहालच्या (Taj Mahal) वास्तुवर त्याचा काही परिणाम होणार नाही आणि पूर आला तरी वास्तूच्या आत पाणी जाणार नाही. पूरपरिस्थितीतही ताजमहालच्या (Taj Mahal) आत पाणी का जाणार नाही? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
जवळपास अर्ध्या शतकानंतर यमुनेचं पाणी ताजमहालच्या भिंतीजवळ आल्याची घटना घडली आहे. 1978 मध्ये यमुनेचं पाणी ताजमहालच्या भिंतीपर्यंत पोहोचल्याचा प्रकार घडला होता, त्यानंतर यावर्षी त्याची पुनरावृत्ती झाली. प्रसारित झालेल्या फोटोमधून आपण पाहू शकतो की ताजमहालच्या मागे बांधलेली बाग पाण्यात बुडाली आहे आणि पाणी ताज महलच्या अगदी जवळ आलं आहे. पण जास्त पाणी साचलं तरी ताजमहालबद्दल काळजी करण्यासारखं काही नाही.
पुरातही आत शिरणार नाही पाणी
खरं तर, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावर देखरेख करणाऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणात (एएसआय) या ऐतिहासिक वास्तूला पाण्यापासून कोणताही धोका नसल्याचं म्हटलं गेलं आहे. एएसआयचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ राज कुमार पटेल यांनी इंडियन एक्स्प्रेसला या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, "पुराचं पाणी ताज महलमध्ये जाण्याची शक्यता नाही. या वास्तुला कोणत्याही प्रकारचा धोका नसावा, अशा पद्धतीने या वास्तुची रचना करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मोठा पूर आला तरी ताजमहालमध्ये पाणी शिरु शकत नाही.
पाणी कमी झाल्यास मात्र वाढते चिंता
ताजमहालमधील मुख्य समाधी (मकबरा) उंच मचाणावर बांधलेली आहे. तिच्या भोवती 42 विहिरी आहेत आणि विहिरींच्या वर साल लाकडाची रचना आहे. ताजमहाल एक प्रकारे लाकडाचा पाया रचून बांधला गेला आहे आणि त्या पाणी या लाकडांच्या संपर्कात आल्यास ती अजून मजबूत होतात, असं म्हटलं जातं. त्यामुळे जेव्हा यमुनेतील पाणी कमी होतं, तेव्हा ताजमहालसाठी ही चिंतेची बाब आहे, कारण त्यामुळे ताजमहालचा पाया कमकुवत होतो, लाकूड कमकुवत होतं. काही लाकडं अशी असतात की त्यांना पाण्यामधूनच ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे ते मजबूत राहतात.
यावरुन असा अंदाज लावला जाऊ शकतो की ताजमहालची रचना एका खास पद्धतीने केली गेली आहे, ज्यामुळे वास्तुला कोणताही धोका नाही. सध्या यमुना नदी आग्र्यात (Agra) 498 फूट पातळीवर वाहत असून, त्यात पुराची कमाल पातळी 495 फूट, तर मध्यम पातळी 499 फूट आहे. मात्र येत्या काही दिवसांत पुराचं पाणी 500 फूट ओलांडू शकतं, असं म्हटलं जात आहे.
हेही वाचा: