Sangli Rain: सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस! चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी; नद्यांच्या पाण्यात प्रचंड वाढ
Sangli Rain: राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. सांगलीत देखील पावसाची संततधार सुरू आहे. चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे, तर वारणा आणि कृ्ष्णा नदीची पाणीपातळी वाढली आहे.
Sangli Rain : सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू आहे, तर काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत (River Water Lever Rises) वाढ होऊ लागली आहे. चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून चांदोली धरण (Chandoli Dam) परिसरात 24 तासांत 67 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सांगलीतील (Sangli) यंदाची ही पहिलीच अतिवृष्टी आहे आणि यामुळे वारणा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे.
वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वारणा नदी दुथडी भरुन वाहत आहे. दुसरीकडे सांगलीजवळील कृष्णा नदीतील पाणी पातळी देखील आता वाढू लागली आहे. अद्याप कोयना धरणातून नदीत विसर्ग सुरु न केल्याने संथ गतीने पाणी वाढत आहे.
कोकरुड येथील बंधारा पाण्याखाली गेला
शिराळा तालुक्यातून जाणाऱ्या वारणा नदीची पाणीपातळी वाढून कोकरुड येथील बंधारा पाण्याखाली गेला. वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रासह वाहतूक ठप्प झाली आहे. शाहूवाडी परिसरात सोमवारी रात्रीपासून तालुक्याच्या पश्चिम भागातील संततधार पाऊस सुरु आहे. सकाळपासून जोर वाढल्याने कोकरुडला येण्यासाठी ओढे, तुरुकवाडीमार्गे पाच-सहा किलोमीटर दूरचा प्रवास करावा लागत आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट
सलग दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रायगड (Raigad Rain) आणि पुण्यातील घाट माथ्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून पालघर (Palghar), सातारा (Satara), पुणे (Pune) आणि रायगड (Raigad) जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या भागात किती मिमी पावसाची नोंद?
गेल्या चोवीस तासांमध्ये महाबळेश्वर (Mahabaleshwar Rain), दापोली (Dapoli), चिपळूण (Chiplun) यांसारख्या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 196.0 मिमी इतका पाऊस बरसला, तर दापोली 255.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. चिपळूणमध्ये 152.0 मिमी पाऊस झाला असून पोलादपूरमध्ये (Poladpur Rain) 224.5 मिमी पाऊस बरसला आहे. तर लोणावळ्यात (Lonavala Rain) असलेल्या लवासामध्ये (Lavasa City) 77.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसामुळे डोंगराळ भागामध्ये दरड कोसळण्याची भीती असल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा: