(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral News : पॅनल रूममध्ये फणा पसरून बसला कोब्रा, रेल्वे मास्तरला पळता भुई थोडी
Snake Viral Photo : कोटा विभागातील रावथा रोड स्टेशनवरून एक धक्कादायक फोटो समोर आला आहे. इथं पॅनेल रुममध्ये चक्क सहा फूट लांब कोब्रा साप फणा पसरून बसलेला दिसला. यानंतर सर्वांनाच पळता भुई थोडी झाली.
Trending News : साप हा विषारी प्राणी असल्यामुळे साप म्हटलं की माणसंचं काय प्राणी सुद्धा घाबरून दूर पळतात. कुणाच्या समोर जर अचानक साप आला तर चांगलीच धांदळ उडते. प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन पळ काढतो. क्रोबा हा सर्वात विषारी सापल मानला जातो. असाच एक सहा फूट लांब क्रोबा अचानक तुमच्या समोर आला तर...? सध्या असाच एक फोटो समोर आला आहे. यामध्ये रेल्वे स्टेशनमधील पॅनल रुममध्ये चक्क एक क्रोबा फणा पसरुन बसलेला पाहायला मिळाला.
नेमकं काय घडलं?
अलीकडेच कोटा विभागातील रावथा रोड स्टेशनच्या पॅनेल रूममध्ये एक दृष्य पाहून अनेकांना घाम फुटला. एक सहा फूट लांब कोब्रा साप पॅनेल रूममध्ये बसला होता. हे दृश्य पाहून स्टेशन मास्तर टेबलामागील बाकावर बसले. त्यांच्या सापाच्या पुढ्यात जायची हिंमत होईना.
A six feet Cobra sneaked on the table of railway officer at Panel room of Ravtha Road (RDT), Kota Division. It however did not affect train services on the busy section. Station is thronged by thousands of engineering/medical aspirants daily pic.twitter.com/4F0SNoZ1TR
— Deepak Kumar Jha (@journalistjha) June 1, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, पॅनेल रूममध्ये आलेल्या कोब्रा सापाची लांबी सहा फूट होती. 6 फूट लांब आणि महाकाय कोब्रा साप सिग्नल पॅनलवर आरामात फणा काढून बसला होता. यादरम्यान स्टेशन मास्तर सापापासून बचाव होण्यासाठी भीतीपोटी मागे असलेल्या टेबलावर बसले. त्यांनी कोटा कंट्रोलरला कंट्रोल रुममध्ये साप असल्याची माहिती दिली.
पॅनेल रूममध्ये साप असल्याची माहिती उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. घटनास्थळी पोहोचलेल्या पॉइंसमनने या कोब्रा सापाची सुटका केली. दरम्यान, पॅनल रूममध्ये बसलेल्या सापाचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
इतर बातम्या