Most Expensive Drink : जगातील सर्वात महागडी बियर; एका बियरच्या बाटलीचं बिल 71 लाख रुपये, काय आहे प्रकरण?
Most Expensive Drink : मॅनचेस्टरमध्ये (Manchester) एका व्यक्तीला एका बियरच्या बाटलीसाठी 99,983.64 डॉलर (सुमारे 71 लाख) रुपये बिल आकारण्यात आलं. त्यानंतर हॉटेलनं बिल बनवताना चूक झाल्याचं मान्य केलं आहे.
Trending News : हॉटेलमध्ये एका बियरच्या बाटलीचं बिल सर्वसाधारणपणे काही हजारांपर्यंत असतं. मात्र अशाच एका बियरच्या बाटलीसाठी तुम्हांला लाखो रुपये मोजावे लागले तर...? चकित झालाात ना... अशीच काहीशी घटना एका व्यक्तीसोबत घडली आहे. एका ऑस्ट्रेलियाच्या एका लेखकाला एका बियरच्या बॉटलसाठी सुमारे 99,983.64 डॉलर (सुमारे 71 लाख) रुपये बिल आकारण्यात आलं. त्यामुळे या व्यक्तीला जगातील सर्वात महागडी बियर पिण्याचा इतिहास रचला आहे. आता याला व्यक्तीचं भाग्य म्हणावं की दुर्भाग्य की यासाठी त्यांना 71 लाख रुपये मोजावे लागले.
काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावर पीटर लालोर यांनी ट्विट करत या घटने बाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरवर ट्विट करत त्यांच्या ड्रिंकचा एख फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहिलं आहे की, 'ही बियर पाहिली का? ही जगातील सर्वात महागडी बियर आहे. ही आदल्या दिवशी मॅनचेस्टरमधील मालमाइसन हॉटेलमध्ये या बियरसाठी 99,983.64 डॉलर (सुमारे 71 लाख) रुपये मोजले आहेत.'
या ट्विटच्या माध्यमातून पीडित व्यक्ती लालोर यांनी संपूर्ण घटनेचा खुलासा केला आणि लिहिलं की, 'जेव्हा त्यांनी मला बिअरचे बिल दिलेंतेव्हा माझ्याकडे चष्मा नव्हता आणि त्यानंतर हॉटेलच्या स्वाइप मशीनमध्येही काही समस्या होती. त्यामुळे मी त्याबद्दल जास्त विचार केला नाही आणि बिल दिलं. मी वेटरला मला पावती नको असं सांगितल्यानं ती निघून गेली.'
See this beer? That is the most expensive beer in history.
— Peter Lalor (@plalor) September 5, 2019
I paid $99,983.64 for it in the Malmaison Hotel, Manchester the other night.
Seriously.
Contd. pic.twitter.com/Q54SoBB7wu
लालोर बिलाबाबत संशय आला
ट्विटमध्ये लालोर यांनी पुढे सांगितलं की, त्यांना बिलामध्ये काहीतरी गडबड असल्याचं दिसलं. त्यामुळे त्यांनी तिथल्या बार टेंडरला बिल वाचण्यास सांगितलं, मग त्याचं बिल बघून बार टेंडरने तोंड दाबून हसू लागला आणि काहीही बोलण्यास तयार नव्हता. यानंतर एक छोटीशी चूक झाली आहे, ती दुरुस्त करते असं सांगून ती निघून गेली.
Anyway, I didn’t have my reading glasses when she presented me with a bill for the beer and when she had some problems with the machine I didn’t think much of it, but it was eventually resolved, I said I didn’t want a receipt and she went to leave.
— Peter Lalor (@plalor) September 5, 2019
लालोर यांना बिलाची रक्कम कळताच त्यांनी ती तातडीने दुरुस्त करण्यास सांगितलं. लालोर यांना बिलाची रक्कम कळल्यावर त्यांनी बार अटेंडंटला चूक ताबडतोब सुधारण्यास सांगितली. तिनं मॅनेजरकडे धाव घेतली, त्यांनी परिस्थिती अधिक गांभीर्याने घेत आणि उर्वरित पैसे परत करण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलं. हॉटेलने या घटनेबद्दल माफी मागितली आहे आणि बिलमधील त्रुटीसंदर्भात चौकशी करत असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
इतर बातम्या