Viral Video : नवरीचा अनोखा स्वॅग; लग्नाआधी स्कूटीवरून काढला पळ, 'हे' आहे कारण
Viral Video : सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरी लग्नाच्या जोड्यामध्ये स्कुटीवरून जात आहे.
Viral Video : आजकाल लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लग्न समारंभातील वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ अवघ्या काही सेकंदात व्हायरल होतो. असे व्हिडीओ नेटकऱ्यांचं उत्तम मनोरंजन करतात. अशातच आता एका नवरीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ही नवरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
आजकाल इंटरनेटवर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नववधू लग्नाच्या जोड्यामध्ये स्कूटी चालवताना दिसत आहे. ती 'शादी के मंडप से तू खुद को भागा' या गाण्याच्या ओळींवरवर लिप सिंक करताना दिसत आहे. ही वधू बाकीच्या नववधूंपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. साधारणपणे नवरी लाजाळू असते. मात्र ही नवरी न लाजता आणि संकोच न करता लग्नाच्या जोड्यात स्कूटर चालवताना दिसते.
व्हायरल व्हिडीओमधील ही नवरी लग्नातून पळून जात नाहीय. तर तिला लग्नाआधी मनमोकळेपणाचा आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे ती एकटीच स्कूटरवरून निघाली आहे. लग्नाच्या लेहेंग्यात वधू खूपच सुंदर दिसत आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर लोक खूप पसंत करत आहेत.
View this post on Instagram
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर ब्राइडल लेहेंगा डिझाइन (Bridal Lehenga Design) नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओला लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओला अनेक लोक लाईक आणि शेअर करत आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या