(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navratri 2023: यंदाच्या नवरात्रीत बनवा उपवासाच्या पुऱ्या; आरोग्यासाठीही पौष्टिक, जाणून घ्या सोपी रेसिपी
Navratri 2023 Recipe: नवरात्रीत तुमचाही उपवास असेल तर तुम्ही उपवासाच्या पुऱ्यांची रेसिपी ट्राय करू शकता.
Navratri 2023 Recipe: हिंदू धर्मात नवरात्रीच्या (Navratri 2023) व्रताला विशेष महत्त्व आहे. देवीचा हा उत्सव आता सुरू झाला असून अनेकांचे उपवास देखील सुरू झाले आहेत. नऊ दिवस चालणाऱ्या या उपवासादरम्यान शरीरात ऊर्जा टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. अशा परिस्थितीत उपवासाला खायचं काय? बनवायचं काय? असे प्रश्न मनात येतात. यासाठीच आज उपवासासाठीची एक खास रेसिपी पाहूया, जी चवीस रुचकर आहे आणि तुम्हाला दिवसभर एनर्जी देखील देईल. अशा वेळी तुम्ही झटपट उपवासाच्या पुऱ्या बनवू शकता. पण त्या कशा बनवायच्या? त्यासाठीची रेसिपी जाणून घेऊया. या पुऱ्या तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत देखील खाऊ शकता.
उपवासाच्या पुऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य
- अर्धा वाटी भगर
- 1 उकडलेला बटाटा
- 1-2 हिरव्या मिरच्या
- 1 चमचा काश्मिरी लाल तिखट
- मीठ
- तेल
- गरज पडल्यास पाणी
उपवासाच्या पुऱ्या बनवण्याची कृती
- अर्धी वाटी भगर मिक्सरमधून बारीक करुन त्याचं पीठ तयार करुन घ्या.
- आता 1 उकडलेला बटाटा किसून घ्या.
- हा किसलेला बटाटा भगरीच्या पिठात मिक्स करा.
- आता यामध्येच 1 चमचा ठेचलेली हिरवी मिरची घाला.
- यानंतर चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट घाला आणि सर्व मिश्रण चांगलं मळून घ्या.
- हे पीठ मळताना पाण्याची आवश्यकता लागत नाही.
- परंतु तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही थोडं पाणी घालू शकता.
- पीठ मळून झाल्यावर 15 मिनिटं झाकून ठेवा.
- यानंतर हाताला थोडं पाणी लावून पीठ पुन्हा मऊ मळून घ्या.
- पिठाचे लहान-लहान गोळे करा.
- याच्या एकसारख्या गोलाकार पुऱ्या लाटा.
- कढईतील तेल चांगलं गरम करा.
- तेल गरम झाल्यावर या तेलात पुऱ्या चांगल्या खरपूस तळून घ्या.
- दोन्ही बाजूने पुऱ्या तळून घेतल्यावर ताटात काढून घ्या.
- या पुऱ्या तुम्ही बटाट्याची भाजी किंवा दह्यासोबत खाऊ शकता.
View this post on Instagram
शारदीय नवरात्रीमध्ये उपवासाचे महत्त्व
नव म्हणजे नऊ आणि नवीन. शारदीय नवरात्रीपासून थंडीमध्ये निसर्ग रुप पालटतो. ऋतू बदलू लागतात. यामुळेच नवरात्रीच्या काळात भाविक संतुलित आणि सात्विक आहार घेतात, तसेच देवीचे चिंतन आणि ध्यानावर लक्ष केंद्रित करून स्वतःला आत्मशक्तिशाली बनवतात. त्यामुळे ऋतुबदलाचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही.
हेही वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )