Viral Video : म्हशींच्या कळपापुढे 'जंगलाचा राजा' हतबल, घाबरून झाडावर चढण्याची वेळ, व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्की हसाल
Viral Video : कधी कधी जंगलाच्या राजालाही जीवन-मरणाच्या खेळात पराभूत व्हावे लागते. हा व्हिडीओ पाहून तुम्हांला याचा प्रत्यय येईल.
Viral Video : सिंहाला 'जंगलाचा राजा' म्हटले जाते, परंतु काहीवेळा इतर प्राणी जंगलाच्या राजावर मात करतात. याचे एक उदाहरण या व्हिडीओमध्ये पाहता येईल. या व्हिडीओमध्ये इतर प्राण्यांची शिकार करणारा स्वतःच शिकार होताना दिसत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सिंह म्हशींच्या कळपाच्या भीतीने झाडावर चढल्याचं दिसून येतंय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल, कारण सिंह झाडावर लटकलेला पाहून तुम्हालाही गंमत वाटेल.
कधी कधी जंगलाच्या राजालाही जीवन-मरणाच्या खेळात पराभूत व्हावे लागते. अशावेळी कोल्हा देखील सिंह बनतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, म्हशींचा कळप झाडाखाली उभा आहे. मात्र, सिंह त्यांची शिकार करण्याऐवजी झाडावर चढत आहे. हा व्हिडीओ पाहून म्हशींचा कळप पाहून सिंह घाबरला असून जीव वाचवण्यासाठी झाडावर चढत असल्याचं दिसतंय.
View this post on Instagram
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, सिंह आपला जीव वाचवण्यासाठी झाडावर चढला. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरेनास झालं आहे. या व्हिडीओवर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, जंगलातील जग खरोखरच विचित्र आहे, येथे काय व्हायरल होईल याबद्दल काहीही सांगता येत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Viral Video : सायकल चालवत मुलानं काही सेकंदात सोडवलं रुबिक्स क्यूब, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
- Viral Video : मोराच्या अंड्याची चोरी करणं पडलं महाग, पुढे असं काही घडलं की...
- Trending Video : 'मैं झुकेगा नहीं'..नवजात बाळाचा ‘पुष्पा’ स्वॅग, चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले फॅन!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha