Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
Uddhav Thackeray on RSS: अशी चर्चा एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरून चर्चा कशी काय होऊ शकते आणि इतक्या वर्षानंतर यांना अचानक वंदे मातरम का आठवलं? अशी विचारणा त्यांनी केली.

Uddhav Thackeray on Amit Shah: तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमांस खातो खातो कोण मला अडवतो बघतो. अमित शाहांना जर हिम्मत असेल माझ्या हिंदुत्वावर त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजूजी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावर चर्चा कशी होऊ शकते?
उद्धव ठाकरे यांनी संसदेच्या अधिवेशनात ‘वंदे मातरम’ विषयावर चर्चा सुरू असताना त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, गेले दोन तीन दिवस लोकसभेच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम या विषयावर चर्चा सुरु आहे. अशी चर्चा एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरून चर्चा कशी काय होऊ शकते आणि इतक्या वर्षानंतर यांना अचानक वंदे मातरम का आठवलं? अशी विचारणा त्यांनी केली.
वंदे मातरम चर्चा संघाचे कपडे उतरवण्यासाठी घेतली आहे का?
त्यांनी वंदे मातरमचा उल्लेख 'वन डे मातरम' असा करत टीका केली. ते म्हणाले, भाजपचं वंदे मातरम हे फक्त वन डे मातरम आहे एका दिवसासाठी आहे. कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काय पडलेली नाही. वंदे मातरम म्हणताना माझी माता किती दुःखात आहे याच्याकडे त्यांच लक्ष नाही. वंदे मातरमवर चर्चेचा उद्देश स्पष्ट करताना त्यांनी शंका व्यक्त केली. ते म्हणाले की, वंदे मातरम ही चर्चा त्यांनी मला असं वाटतं की संघाचे कपडे उतरवण्यासाठी घेतली आहे का? कारण त्यावरून बऱ्याच गोष्टी आता बाहेर आल्या. अगदी ते ज्यांना देव मानतात त्या श्यामाप्रसाद मुखर्जींचे सुद्धा मुस्लिम लीगसोबत काय साठलोट होतं आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी चले जावला कसा विरोध केला होता, ते समोर आलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, फजलूल हक बरोबर बंगालच्या सरकारमध्ये हे त्यांचे देव, श्यामाप्रसाद मुखर्जी हे देशप्रेम बाजूला ठेवून कसे सामील झाले होते हे सगळं आता समोर आलं आहे. आणखी तीन ठिकाणी त्यांनी मला वाटत मुस्लिम लीगबरोबर सरकार स्थापन केली होती. हे यांचे राजकारणातले जन्मदाते आणि यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायचं, असा हल्लाबोल त्यांनी केली.
अमित शाहांना लाज वाटली पाहिजे
हिंदुत्वावरून ते म्हणाले की, साधू हत्याकांडातील संबंधित व्यक्तीला भाजपत घेताना तुमच हिंदुत्व काय मेलं होतं? अमित शाहाना त्यांनी माझ्या हिंदुत्वावर शंका व्यक्त करताना लाज वाटली पाहिजे. त्यांच्या बुडाखाली जे काही हिंदुत्व आहे ते पहिलं बघायचं आणि मग त्यांनी माझ्यावरती आरोप केले पाहिजेत, असा टोला त्यांनी लगावला. दिल्लीत तुम्ही मंदिर पाडून तिकडे मंदिर संघाचे कार्यालय उभारताय. अमित शाहांनी मला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. जर आणखी काही गोष्टी काढल्या तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, असा इशारा त्यांनी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या























