GK: चिनी सैनिकांना 'या' पदार्थावर आहे बंदी; मग शी जिनपिंग त्यांच्या सैन्याला कोणत्या प्रकारचं अन्न देतात?
चिनी सैनिकांना कोणत्याही प्रकारचं अन्न देण्याआधी डायटीशियनचा सल्ला घेतला जातो. यासोबत संपूर्ण सैन्याचा जेवणाचा मेन्यू हा कॉम्प्युर जनरेटेड असतो, याला चीनमध्ये मिलिट्री रेसिपी सिस्टीम देखील म्हणतात.
China Army: चीन हा भारताचा (India) शेजारी देश असण्यासोबतच तो जगातील एक ताकदवान देश देखील आहे. भारताचं तर बऱ्याचदा अनेक मुद्द्यांवरुन चीनशी वाजतं. भारतासोबत चीनने (China) एकदा युद्ध देखील केलं आहे. अशातच, चीनमधील चीनची सेना आणि चिनी सैनिकांबद्दल आपण जाणून घेतलं पाहिजे.
चीनमध्ये भारताप्रमाणे स्वतंत्र लोकशाही नाही. तिथे फक्त बोलण्यापुरती लोकशाही आहे, पण मागील काही वर्षांपासून चीनमध्ये शी जिनपिंग यांचा इतका दरारा आहे की, चीनमधील पान देखील शी जिनपिंग यांच्या आदेशाशिवाय हलत नाही. चिनी सैन्यासाठी देखील जिनपिंग यांनी विशेष नियम बनवले आहेत, त्यामुळेच चीनमधील सैन्य हे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यापैकी एक आहे. तर चिनी सैन्याला सुदृढ राहण्यासाठी कोणतं जेवणं दिलं जातं? हे पाहूया.
कसा ठरतो चिनी सैन्याच्या जेवणाचा मेन्यू?
चीनमधील सैनिक काय खाणार? याचा निर्णय विचारपूर्वक केला जातो. चीनच्या एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांना कोणतंही जेवण देण्याआधी पहिला आहारतज्ज्ञांचा (Dietician) सल्ला घेतला जातो. यासोबतच संपूर्ण सैन्याचा जेवणाचा मेन्यू हा कॉम्प्युर जनरेटेड असतो, याला चीनमध्ये मिलिट्री रेसिपी सिस्टीम (Military Recipe System) देखील म्हणतात. जेव्हाही कोणत्या सैनिकासाठी शेफला काही बनवायचं असतं, तेव्हा शेफ कॉम्प्युटर सिस्टीमची मदत घेतात.
'या' पदार्थांमुळे चिनी सैन्य सर्वात बलवान
चिनी सैनिक दिवसाच्या सुरुवातीला नाश्ता (Breakfast) करतात. यात त्यांना केक, कॉर्नब्रेड, अंडे आणि दूध दिलं जातं. यानंतर दुपारच्या जेवणात (Lunch) आणि रात्रीच्या जेवणात (Dinner) चिनी सैनिकांना भात, मोड आलेली कडधान्यं, रोल्स, मोमो आणि मीट रोल या पदार्थांची व्यवस्था केली जाते. यासोबतच त्यांना लसणासोबत शिजवलेलं पोर्क (डुकराचं मटण) देखील दिलं जातं. चिनी वेबसाईटच्या माहितीनुसार, दर 1,000 सैन्याच्या मागे 125 किलो पोर्क शिजवलं जातं. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नाश्त्यात प्रत्येक चिनी सैनिकाला अंडे आणि 250 लीटर दूध आवश्यक आहे.
चिनी सैनिकांना 'हे' पिण्यास मनाई
चीनमधील सर्वात मोठं वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, चिनी सैनिकांना दारु पिण्यावर मनाई आहे. चीनमधील सैनिक दारु पिऊ शकत नाही. हा कायदा 1990 पासून लागू आहे आणि आजही चिनी सैन्यात याचं काटेकोरपणे पालन केलं जातं.
हेही वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )