(Source: ECI/ABP News/ABP Majha)
China Ban Apple iPhone : 'ड्रॅगन'चा अमेरिकेला झटका! अॅपल 'प्रोडक्शन हब' चीनमध्येच आयफोनवर बंदी, काय आहे यामागचं कारण?
China Ban Iphone : अॅपल 'प्रोडक्शन हब' मानल्या जाणऱ्या चीननेच आयफोनवर बंदी घातली आहे. चीनचा अमेरिकेला हा मोठा झटका मानला जात आहे. यामागचं कारण काय जाणून घ्या.
बीजिंग : चीनने अमेरिकन कंपनी अॅपलला (Apple) मोठा दणका दिला आहे. चीन सरकारने आयफोनवर बंदी (iPhone) घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अॅपल 'प्रोडक्शन हब' मानल्या जाणऱ्या चीनमधेच आयफोनवर बंदी(China Ban Apple iPhone) घालण्यात आल्याने ही चीनचा अमेरिकेला हा मोठा झटका मानला जात आहे. चीनने सरकारी अधिकाऱ्यांना अॅपलचा कंपनीचा आयफोन वापरण्यास बंदी घातली आहे. एकीकडे अमेरिका आणि चीन यांच्यात तणावाचं वातावरण असतात, हा अमेरिकेला मात्र आता दणका बसला आहे.
चीनचा अमेरिकेला झटका!
चीनने सरकारी अधिकाऱ्यांच्या आयफोन वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे अॅपल कंपनीच्या शेअरवर परिणाम दिसून येत आहे. अॅपल कंपनी यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने आयफोन वापरावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला. यामुळे चीनमधील आयफोन युजर्समध्ये घट होईल आणि याचा परिणाम अॅपलचा कंपनीवर होणार आहे.
चीनमध्ये आयफोन वापरावर बंदी
मीडिया रिपोर्टनुसार, चीन सरकार विदेशी ब्रँडच्या उपकरणांचा वापर कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना विदेशी डिव्हाईसेस कार्यालयात आणणे आणि वापरण्यास मनाई केली आहे. सध्या केंद्र सरकारच्या अनेक संस्था आणि विभागांकडून अधिकाऱ्यांना आयफोन वापरास मनाई करण्यात आली आहे. यापुढे हा निर्णय देशभरात व्यापक स्तरावर लागू करण्याचाही विचार सुरु आहे.
अधिकृत आदेश जारी होणं बाकी
रिपोर्टनुसार, सरकार आयफोन बंदीचा निर्णय व्यापक स्तरावर लागू करण्याच्या विचारात असली तरी, विविध कंपन्या आणि संस्था हा निर्णय मान्य करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अद्याप याबाबत कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही. चीन सरकार संवेदनशीलतेसाठी विदेशी डिव्हाईसेसचा वापर कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. याच पार्श्वभूमीवर चीन सरकारने हे मोठं पाऊल उचललं आहे. आता हा निर्णय चीनमध्ये अधिकृतपणे कधीपासून लागू होईल हे पाहावं लागेल.
यामागचं नेमकं कारण काय?
अमेरिका हेरगिरीसाठी आयफोनला हॅक करत असल्याचा दावा रशियाने केला होता. रशियाच्या डिजिटल डेवलपमेंट मंत्रालयाने, सरकारी कामांसाठी आयफोन वापरण्यासाठी बंदी घातली. चीनने देखील रशियाच्या पावलावर पाऊल ठेवत हा निर्णय घेतला आहे. याचं दुसरं कारण असं की, अमेरिकेने चीनी कंपनी हुआवेई (Huawei) च्या वापरावर बंदी घातली असून चीनी अॅप टीक टॉकवरही बंदी घालण्याचा विचार सुरु आहे.