एक्स्प्लोर

Deadline End in September: 30 सप्टेंबरपूर्वी 'ही' कामं कराच, नाहीतर होईल मोठं नुकसान; तुमच्या आर्थिक व्यवहारांवरही होईल परिणाम

Financial Deadlines: सप्टेंबरमध्ये पाच महत्त्वाच्या कामांची मुदत संपत आहे. ही कामं पूर्ण न केल्यास तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.

September 2023: सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. देशात सप्टेंबर (September) महिन्यानंतर अनेक बदल पाहायला मिळणार आहे. या महिन्यात अनेक आर्थिक कामांसाठी शेवटची मुदत (Deadline) आहे, जी तुम्ही वेळीच पूर्ण करायला हवी. ही कामं वेळीच पूर्ण न केल्यास तुमचं आर्थिक (Finance) नुकसान देखील होऊ शकतं. त्यामुळे 30 सप्टेंबर 2023 रोजी होणार्‍या 5 बदलांबद्दल माहिती घेऊयात...

स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये पॅन-आधार लिंक

आर्थिक विभागाच्या म्हणण्यानुसार, 30 सप्टेंबर 2023 पर्यंत छोट्या बचत योजनेत पॅन कार्ड आधारशी लिंक करणं आवश्यक झालं आहे. त्यामुळे, तुम्ही तुमचं बचत खातं किंवा पोस्ट ऑफिस स्कीम शक्य तितक्या लवकर पॅन कार्ड, आधार कार्डशी लिंक करा, जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमचं खातं गोठवलं जाईल.

छोट्या बचत योजनेत आधार कार्ड-पॅन कार्ड खातं लिंक नसल्यास 1 ऑक्टोबर 2023 पासून खातं गोठवलं जाईल किंवा निलंबित केलं जाईल. आधार-पॅन खात्याशी लिंक न केल्यास व्याज देखील मिळणार नाही.

2000 च्या नोटा बदलणं

RBIने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 ठेवण्यात आली होती. 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्या लागणार आहेत, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं

SBI बँकेची स्पेशल एफडी

ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI बँकेची एक मुदत ठेव योजना आहे. या We Care ठेव योजनेत गुंतवणूक करण्याची 30 सप्टेंबर 2023 ही अंतिम मुदत आहे. या योजनेसाठी फक्त ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत, जे उच्च एफडी व्याज दर घेऊ शकतात. SBI WeCare योजना 7.50 टक्के व्याजदर देते.

IDBI बँकेची अमृत महोत्सव एफडी

375 दिवसांच्या अमृत महोत्सव एफडी योजनेअंतर्गत, IDBI बँक सामान्य, NRE आणि NRO ला 7.10 टक्के व्याजदर देते. बँक ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज दर ऑफर करते. या योजनेअंतर्गत बँक सर्वसामान्य नागरिकांना 7.15 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांसाठी 7.65 टक्के व्याज देते. त्यामुळे या एफडीचा फायदा तुम्ही लवकरात लवकर घेऊ शकता.

डीमॅट, एमएफ नॉमिनेशन

SEBI ने ट्रेडिंग आणि डिमॅट खातेधारकांसाठी नावनोंदणी किंवा नाव कमी करण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. सुधारित मुदतीनुसार, अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mutual Fund : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनो दोन आठवड्यात आधी हे काम करा, अन्यथा होईल मोठं नुकसान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget