Viral Video : अनियंत्रित हायस्पीड वाहनाचा भीषण अपघात, दोन्ही टायर झाले वेगळे; थरकाप उडवणारा व्हिडीओ होतोय व्हायरल
Accident Viral Video : नुकताच कारच्या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Accident Viral Video : सोशल मीडियावर आपल्याला अपघाताशी संबंधित अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. या व्हिडीओमध्ये अगदी आश्चर्यकारक अपघात होताना दिसतो. असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून यूजर्सना सावधानतेचा इशारा देण्यात येतो. तसेच, भविष्यात असे अपघात घडू नयेत यासाठी कशी काळजी घेतली पाहिजे हे देखील या माध्यमातून सांगितले जाते. नुकताच एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेजचा आहे. यामध्ये एक थार कार चार चाकांवर भर वेगाने येताना दिसतेय. हा अपघात एवढा भीषण आहे की, त्या दरम्यान कारच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचा मृत्यूही होऊ शकला असता किंवा गंभीर जखमी झाले असते. मात्र, रात्री उशिरा असल्याने रस्ता पूर्णपणे रिकामा होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
पाहा व्हिडीओ :
राजस्थान के जोधपुर में दिखा हैरान कर देने वाला हादसा. चार पहियों पर नाचते नजर आई थार, जिसके कारण फट गए 4 टायर और आगे के दो टायर भी निकल गए. तेज रफ्तार के कारण बैलेंस बिगड़ा. ट्रैफिक नहीं होने के कारण टली बड़ी दुर्घटना...#TrendingNow #Trending #Viral #ACCIDENT pic.twitter.com/XZltCJlRSb
— Narendra Singh (@NarendraNeer007) December 1, 2022
तोल गेल्याने झाला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना राजस्थानमधील जोधपूरची आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात थारचे चार टायर फुटले आणि समोरचे दोन टायरही घसरल्याने निखळले आहेत. सध्या हा व्हिडीओ पाहून हे दिसून येत आहे की, वाहनाचा वेग हाताळता न आल्याने चालकाचा तोल गेला आणि हा अपघात झाला.
व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स सतर्क झाले
मिळालेल्या माहितीनुसार, थारमधील तीन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर यूजर्सना चांगलाच धक्का देत आहे. अनेकदा वेग जास्त असल्याने वाहन अनियंत्रित होऊन अपघाताला बळी पडताना आपण पाहतो. अशा परिस्थितीत, अपघातांचे व्हिडीओ समोर येत आहेत जे यूजर्सना सावध करण्याचा इशारा देत आहेत.
महत्वाच्या बातम्या :