Mahayuti Oath Ceremony :Maharashtra Superfast News :महायुती सरकारचा शपथविधी : 05 Dec 2024 :ABP Majha
Mahayuti Oath Ceremony :Maharashtra Superfast News :महायुती सरकारचा शपथविधी : 05 Dec 2024 :ABP Majha
देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी सोहळा.
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात होणार सामील, एकनाथ शिंदे मंत्रीमंडळात सहभागी होण्याबाबत सकारात्मक, आज शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती..
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही आज शपथविधी व्हावा, शिंदेंची मागणी, शिवसेनेला अपेक्षित खाती आणि संभाव्य मंत्र्यांबाबतही चर्चा, तर वरिष्ठांशी चर्चा करणार, फडणवीसांची माहिती.
फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे, अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार.
मुख्यमंत्रिपद ही तांत्रिक बाब, आम्ही तिघेही एकत्र मिळून सरकार चालवणार, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य.
आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार, तर बाकीचे मंत्री अधिवेशनाआधी शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती.
आज शपथविधीनंतर होणार पहिली मंत्रिमंडळाची बैठक,
विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती,
महायुतीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता..