Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Nana Patole: 'माझं मतं सुरक्षित झालं पाहिजे, माझं व्यक्तिस्वातंत्र्य सुरक्षित राहीलं पाहिजे, ते सुरक्षित नसेल तर मी स्वतः ही सुरक्षित राहणार नाही.
Bhandara: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीचा दणदणीत विजय झाला असून देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाच्या गटनेतेपदी नेमणूक झाली. आता शपथविधीला अवघे काही तास राहिले असताना काँग्रेसनेते नाना पटोलेंनी अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नक्की काय घडलं?
बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी नाना पटोले राजीनामा द्यायला तयार आहे. भाजपच्या नेत्यानं निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं पत्र आणावं. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला आम्ही तयार आहोत, सुरुवात आम्ही आमच्यापासूनचं करू. 100 टक्के बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला आम्ही तयार आहोत, अशी इशारावजा टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते परिणय फुके यांचं नावं नं घेता केली. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये ते बोलत होते.
नाना पटोले म्हणाले...
'बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी नाना पटोले राजीनामा द्यायला तयार आहे. भाजपच्या नेत्यानं निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं पत्र आणावं.अशी मागणी करत नाना पटोलेंनी स्वतःचं मतं, व्यक्तिमत्व स्वातंत्र्य आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी गावागावात बॅलेट पेपरची मतदान मोहीम राबवा असं भाषणात सांगितलं. ते म्हणाले, आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भागवत सप्ताह सुरू होईल. त्या भागवत सप्ताहमध्ये सुद्धा ईव्हीएम हटाव,बॅलेट पेपरवर मतदान घ्या, ही स्वाक्षरी मोहीम चालविली पाहिजे, ही राजकीय मोहीम नाही. '
'माझं मतं सुरक्षित झालं पाहिजे, माझं व्यक्तिस्वातंत्र्य सुरक्षित राहीलं पाहिजे, ते सुरक्षित नसेल तर मी स्वतः ही सुरक्षित राहणार नाही. याला राजकारण कसं म्हणता येईल. हे राजकारण नसून, माझ्या मताची सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी ही मोहीम राबवायची आहे. ही मोहीम मी माझ्या स्वतःसाठी, माझ्या लोकशाहीसाठी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानासाठी ही मोहीम चालवायचीय.'
'नाना पटोले राजीनामा द्यायला तयार...'
'बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी नाना पटोले राजीनामा द्यायला तयार आहे. भाजपच्या नेत्यानं निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं पत्र आणावं. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला आम्ही तयार आहोत, सुरुवात आम्ही आमच्यापासूनचं करू. शंभर टक्के बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला आम्ही तयार आहोत, अशी इशारावजा टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते परिणय फुके यांचं नावं नं घेता केली. साकोली विधानसभेतील लाखांदूर इथं काँग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना नाना पटोले बोलत होते. माजी राज्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी नाना पटोले यांनी अगोदर राजीनामा द्यावा आणि नंतर बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी करावी, अशी टीका केली होती. त्याला नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं.