एक्स्प्लोर

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजना चर्चेच्या केंद्रस्थानी होती. आता लाडक्या बहिणींना वाढीव मासिक हफ्ता मिळणार का? असे विचारले जात आहे.

 मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) महायुतीने (Mahayuti) लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. आता ही निवडणूक महायुतीने जिंकली असून 5 डिसेंबर रोजी महायुती सरकार स्थापन होणार आहे. सरकार स्थापन केल्यानंतर महायुती सरकार लडकी बहीण योजनेच्या लाभात वाढ करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. असे असताना आता नवी माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभात सध्यातरी वाढ होण्याची शक्यता धुसर असल्याचं म्हटलं जात आहे. 

आर्थिक स्थितीचा आढावा घेणे गरजेचे

'लोकसत्ता' या मराठी दैनिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार लाडकी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा दिला जाणारा निधी सध्याच वाढण्याची शक्यता नाही. या निधीत वाढ करायची असेल तर त्यासाठी मोठ्या अर्थसंकल्पीय तरतुदीची गरज आहे. त्यासाठी सध्या आर्थिक स्थितीचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या हफ्यात सध्याच वाढ होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं जातंय. 

महायुतीने काय आश्वासन दिलं होतं?

विधानसभा निवडणुकीदरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारा 1500 रुपये प्रतिमहिना लाभ वाढवून 2100 रुपये केला जाईल, असे आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे अनेक जाहीर सभांतून हे आश्वासन अनेकदा करण्यात आले होते. महायुतीच्या घटकपक्षांच्या जाहीरनाम्यातही ही बाब नमूद होती. नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक लोकप्रिय निर्णय घेतले जातात. आज महायुती सरकारची स्थापना होणार आहे. त्यामुळे सरकार स्थापन झाले की पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत सरकार लाडकी बहीण योजनेच्या लाभवाढीची घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. असे असतानाच मात्र ही लाभवाढ करण्याआधी आर्थिक स्थितीचा आढावा घेणे गरजेचे असल्याचे राज्याच्या प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.  

दरम्यान, या वाढीव हफ्त्यावर महायुतीच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. लोकांना 15 लाख रुपयांचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण झाले का? तरीही लोकांनी भाजपालाच मते दिली. त्यामुळे या योजनेतील निधी वाढवला नाही म्हणून कोणी नाराज होणार नाही, असा दावा या ज्येष्ठ नेत्याने केला आहे. त्यामुळे आगामी काळात लाडक्या बहिणींना वाढीव हफ्ता मिळणार का? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

हेही वाचा :

Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis Maharashtra CM: उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला जाणार?; महायुतीकडून निमंत्रण

Devendra Fadnavis Maharashtra CM: आनंद आहेच पण जबाबदारी वाढलीय, पहिल्या भाषणात दूरदृष्टीची झलक,देवेंद्र फडणवीसांचे टॉप 10 मुद्दे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एटीएसच्या कारवाईत धक्कादायक बाबी समोर!  तलवारींसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त 
एटीएसच्या कारवाईत धक्कादायक बाबी समोर!  तलवारींसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त 
प्राध्यापक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल! नवीन फॉर्म्युला काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
प्राध्यापक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल! नवीन फॉर्म्युला काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
मिरा-भाईंदरची पहिली महासभा गाजली, टिपू सुलतान चौकाचं नाव बदलण्याचा ठराव मंजूर, नवीन नाव काय असणार? 
मिरा-भाईंदरची पहिली महासभा गाजली, टिपू सुलतान चौकाचं नाव बदलण्याचा ठराव मंजूर, नवीन नाव काय असणार? 
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?

व्हिडीओ

Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात मशाल महोत्सव, हजारो मावळ्यांच्या सहभागानं अजिंक्यतारा उजळला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अजिंक्यताऱ्यावर मशाल महोत्सव, हजारो मावळ्यांची हजेरी
Raj Thackeray: एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
Vijay Mallya : विजय मल्ल्यानं इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं, भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही म्हणाला, कोर्टात नवा कांगावा
भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही, विजय मल्ल्याचा नवा कांगावा, इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
रुग्णांच्या जीवाशी खेळ, ह्रदयविकाराची शक्यता; बीपीच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
रुग्णांच्या जीवाशी खेळ, ह्रदयविकाराची शक्यता; बीपीच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
Embed widget