![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
NMC Elections 2022 : प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी होणार 16 जुलैला प्रसिद्ध
मनपाच्या निवडणूकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 9 जुलै रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र आक्षेपांचे समाधान करण्याच्या दृष्टीने आता अंतिम मतदार यादी 16 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
![NMC Elections 2022 : प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी होणार 16 जुलैला प्रसिद्ध The final ward wise voter list will be released on July 16 NMC Elections 2022 : प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी होणार 16 जुलैला प्रसिद्ध](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/c60e6cc454b015edfc80d506d014e4ae_original.webp?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 9 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र तक्रारींची संख्या आणि त्याचे समाधान करण्याच्या दृष्टीने या तारखेत बदल करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाद्वारे गुरूवार 16 जुलै 2022 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासंबंधी राज्य निवडणूक आयोगाचे पत्र नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाले असल्याची माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिली आहे.
14 महानगरपालिकांची अंतिम मतदार
राज्य निवडणूक आयोगाद्वारे नागपूर, बृहन्मुंबई, वसई विरार, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण डोबिंवली, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर नाशिक, अकोला व अमरावती या 14 महानगरपालिकांची अंतिम मतदार यादी 9 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. परंतु या महानगरपालिकांकडे प्राप्त झालेल्या हरकतींची संख्या मोठया प्रमाणात असल्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करून हरकतींचा निपटारा करणे गरजेचे आहे असे आयोगाच्या निर्दशनास आले आहे. त्यामुळे सदर 14 महानगरपालिकांकरीता प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 9 जुलै 2022 ऐवजी 16 जुलै, 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.
उमेदवार लागले कामाला
राज्यात सत्तापरिवर्तन होताच आता सर्वांचे लक्ष मनपा निवडणूकीकडे लागले आहे. उमेदवारांनी बंद पडलेले आपले जनसंपर्क कार्यालय सुरु केले असून कार्यकर्त्यांच्या चहा-पाण्याची सोयही सुरु केली आहे. त्यामुळे आता चौका-चौकात चाय पे चर्चा सुरु झाली आहे. आता पक्षांकडूनही उमेदवार निश्चितीसाठी सर्व्हे करण्यात येत आहे. दुसरीकडे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांनी आपल्या पीएची नियुक्ती केली होती. मात्र निवडणूकीनंतर नगरसेवकांनी नागरिकांना दर्शनच दिले नसल्याने आता त्यांची जबाबदारी सांभाळणारे पीए देखील आपली दावेदारी पक्षाकडे करु शकतात, अशी स्थिती काही वार्डात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Politics : सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडा; चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी
विठ्ठलभक्तांसाठी खुशखबर; वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल माफ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
Nagpur : रेल्वेच्या पॅन्ट्रीकारधील गॅस बंद, प्रवाशांना स्थानकावरून विकत घ्यावे लागणार गरम खाद्यपदार्थ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)