Nagpur : रेल्वेच्या पॅन्ट्रीकारधील गॅस बंद, प्रवाशांना स्थानकावरून विकत घ्यावे लागणार गरम खाद्यपदार्थ
गॅस बंद करण्यात आल्याने गरम खाद्य पदार्थ मिळणार नाही. मात्र, गॅस ऐवजी हिटर देण्यात आल्याने प्रवाशांना केवळ गरम चहा मिळू शकणार आहे. नागपूरमार्गे आझाद हिंदसह अनेक पॅन्ट्रीकार असलेल्या गाड्या जातात.
नागपूरः रेल्वेगाड्यांतील आगीच्या घटनांची दखल घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने पॅन्ट्रीकारधील गॅसचे वापर पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे रेल्वेत आता गरमागरम नाश्ता अथवा जेवण मिळणार नसून बेस किचनमधूनच अन्न पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना थंड खाद्यान्नांवरच आपली भूक भागवावी लागणार आहे. रेल्वेगाड्यांत आगीच्या घटनांची दखल घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे रेल्वेने लांबचा प्रवास करण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा आणि नियोजन करुनच प्रवास करा. प्रवाशांना लांबच्या पल्ल्यावर निघण्यापूर्वीच जेवणाची सोय करावी लागणार आहे. स्थानकावरील 'पॅक फूड'ने आपली भूक भागवावी लागणार आहे. पॅन्ट्रीकारच्या माध्यमातून प्रवाशांना गरम खाद्यपदार्थ दिले जाते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेच्या पॅन्ट्रीकारमधील गॅस काढण्याच्या निर्णय उच्चस्तरीय समितीने घेतला आहे. त्यामुळे सर्व रेल्वे गाड्यांमधील गॅस कनेक्शन काढून टाकण्यात आले. यानिर्णयामुळे कोणताही पदार्थ रेल्वेमध्ये बनविण्यात येणार नाही. कंत्राटदारांनी खाद्यपदार्थ बाहेरून बनवून आणून नंतर गाडीत प्रवाशांना द्यावे लागणार आहेत. आता गॅसएवजी हिटरची सोय करण्यात आली आहे. स्टेशनवरुन पॅक केलेले पदार्थ त्यावर गरम करून दिले जाणार आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणावरील प्रवाशांना ते पदार्थ गरम करून देता येणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांना थंड पदार्थ खावे लागत असल्याची ओरड सुरु झाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या प्रवाशांसाठी स्टेशनवरुन तयार पदार्थ अगोदर करून घेणे कंत्राटदारांना शक्य होणार नाही. यामुळे प्रवाशांच्या अडचणीत वाढ होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे नागपुरातील बेस किचन दोन-अडीचवर्षे बंद होते. त्यामुळे प्रवाशांना बेस किचनच्या माध्यमातून सुविधा नव्हती. प्रवाशांना सर्वात मोठी अडचण लाब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जाणार आहे. रेल्वे गाड्यांमध्ये जाणार आहे. रेल्वे गाड्यांमध्ये अन्नपदार्थ पुरविणाऱ्या कंत्राटदारांना रेल्वे स्थानकावरून 'फूड पॅक' घेऊन तेच प्रवाशांना द्यावे लागणार असल्याने गरम पदार्थ प्रवाशांना आता मिळणार नाहीत.
नागपूरमार्गे अनेक गाड्या
गॅस बंद करण्यात आल्याने खाद्य पदार्थ मिळणार नाही. मात्र, गॅस ऐवजी हिटर देण्यात आल्याने प्रवाशांना केवळ गरम चहा मिळू शकणार आहे. नागपूरमार्गे आझाद हिंदसह अनेक पॅन्ट्रीकार असलेल्या गाड्या जातात. प्रवाशांना पॅन्ट्रीकारमुळे गरम अन्नपदार्थ मिळत होते. आझाद हिंदसारख्या गाड्या नेहमीच भरून जात असतात. अशा गाड्यांतील जवळपास दीड हजार प्रवाशांना गरम खाद्य पदार्थ जरी घ्यायचे असेल तर स्थानकावरून लगेच उतरून घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात खाद्यपदार्थ स्वतःला करून घेणे आणि ते टिकवून ठेवणे कठीण आहे.