एक्स्प्लोर

ठाणेकरांनो लक्ष द्या! मेट्रोच्या कामामुळं वाहतूकीत मोठे बदल, तीन दिवस घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूक वळवली

हे काम करताना 550 टन क्षमतेच्या दोन मोठ्या क्रेनचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव वळवण्यात आली आहे.

Thane: ठाण्यातील घोडबंदर पट्ट्यात मेट्रो मार्गिकेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच मेट्रो मार्गिकेसाठी नळपाडा पाइपलाइन परिसरात पिलरवर गर्डर टाकण्याचं काम होणार असल्याने तीन दिवस वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. या कालावधीत रात्री 11 वाजेपासून पहाटे 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.विशेष म्हणजे, ठाण्याहून घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर नळपाडा पाइपलाइन येथे चार पिलरवर लोखंडी गर्डर बसवले जाणार आहेत. हे काम करताना 550 टन क्षमतेच्या दोन मोठ्या क्रेनचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव वळवण्यात आली आहे.

नक्की काय बदल होणार?

शनिवारी 7 जून रात्री 11 वाजेपासून रविवारी 8 जून सकाळी 6 वाजेपर्यंत, तसेच पुढील दोन दिवस म्हणजे 8 व 9 जून रोजीही रात्रीच्या वेळेसच ही वाहतूक बंद राहणार आहे. या बदलामुळे कापूरबावडी सर्कल मार्गे घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कापूरबावडी सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने पुलाखालून उजव्या बाजूस वळून नदीबाबा चौक, ढोकाळी मार्गे पुढे जातील. त्याचप्रमाणे, रवी स्टील नाका येथून डावीकडे वळून, पोखरण रस्ता क्र.2 मार्गे गांधी चौक आणि पुढे खेवरा सर्कलमार्गे वाहनांची वाहतूक वळवण्यात येणार आहे. दुसरीकडे, नळपाडा पाइपलाइन परिसरातून तत्त्वज्ञान विद्यापीठ मार्गे घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहनांना देखील नळपाडा पाइपलाइन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.नागरिकांनी या दरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

कुंभार्ली घाटात संरक्षक भिंत कोसळली

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात अचानक संरक्षक भिंत कोसळली असून रेलिंगही  निखळलीय.घाटात खोल दरीच्या बाजूने असलेली ही भिंत  कोसळली. यामुळे त्या ठिकाणी रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. एवढंच नाही तर या भागातील लोखंडी रेलिंगही तुटलं असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. घटनास्थळी प्रशासनाकडून सध्या फक्त दगड लावून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या उपाययोजना अपुऱ्या असून कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाळ्यात अवजड वाहतूक असणाऱ्या घाटपरिसरात आधीच दृश्यमानता कमी झाल्याने अवजड वाहनांसह मोठी वाहतूक कोंडी होते. त्यात आता रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या संरक्षक भिंतीसह रेलींगही निखळल्यानं अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. 

हेही वाचा:

Rain Update Today: पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुफान पावसाची शक्यता, येत्या 24 तासांत कसं राहणार हवामान?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मोठी बातमी! भाजकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात

व्हिडीओ

Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मोठी बातमी! भाजकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
Embed widget